डेटिंग अॅपवर मैत्री करत आहात, तर सावधान... ही बातमी खास तुमच्यासाठी

गुरुग्राममध्ये एक खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणीला टिंडरवर मैत्री करणं महागात पडलं आहे. या तरुणीनं आपल्या मित्रावर गैरवर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Representative Image
डेटिंग अॅपवर मैत्री करत आहात, तर सावधान... ही बातमी खास तुमच्यासाठी 

नवी दिल्लीः गुरुग्राममध्ये एक खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणीला टिंडरवर मैत्री करणं महागात पडलं आहे. या तरुणीनं आपल्या मित्रावर गैरवर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेचा आरोप आहे की, तरुणानं अॅपच्या माध्यमातून पहिली मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तरुणीनं तरुणावर लग्नासाठी दबाव केला. तेव्हा आरोपीनं लग्नासाठी नकार दिला आणि तरुणीला बदनाम करण्याची धमकीची दिली.

तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मंगळवारी पालम विहार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे. मुळची पंजाबमधल्या एक शहरात राहणारी 30 वर्षीय तरुणीनं तक्रारीत सांगितलं की, गुरुग्राममध्ये राहते आणि येथे एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. 

जवळपास 10 महिन्यांपूर्वी टिंडर अॅपवर त्यांची मैत्री झाली. पंजाबमध्येच राहणाऱ्या कुलविंदर तरुणीला टिंडरवर भेटला. पीडितेनं आरोप केला आहे की, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी तरुणानं तिला पालम विहार येथील आपल्या रूमवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्यानं पीडितेला लग्न करण्याचं आमिष दाखवल आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसातच त्यानं लग्न करण्यास नकार दिला. 

ऑनलाईन डेटिंग अॅपवर आहात का? मग धोक्यांपासून सावध रहा...

डेटिंग अॅपवरील माहितीप्रमाणे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी आपल्या साथीदाराला धोका देण्याचा पर्याय निवडला आणि गैरसंबंधही जोडले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा जोडप्यांनी पुन्हा आपले नियमित काम सुरू केले आणि मुलांच्या सुट्ट्या संपल्या तेव्हा पुन्हा डेटिंग अॅपवर येणाऱ्यांची संख्या आणि ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढली.

२०१९ नोव्हेंबरमध्ये डेटिंग अॅप्सवर सर्वाधिक पुरूष हे बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा, विशाखापट्टणम, नागपूर, सूरत. इंदोर आणि भुवनेश्वर या शहरातील होते.

महलियांच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, इंदोर, सूरत, गुवाहाटी, नागपूर आणि भोपाळ ही शहरं टॉपवर आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी