IIT Bombay | आयआयटीच्या प्राध्यापकाने शेअर केला प्रयोगशाळेतील विद्यार्थ्याचा फोटो, पाहा आयआयटीमधील वास्तव...

IIT Students : भारतातील तुम्हा आम्हा, जवळपास प्रत्येकालाच या नावाची भुरळ पडलेली असते. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला की पुढचे आयुष्य आरामात जाणार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, आयुष्यभर वरच्या पदांवर काम करता येणार इत्यादी असंख्य स्वप्ने, आकांक्षा तरुणांना असतात. या सर्व मुद्द्यांमध्ये गैर काहीच नाही. आयआयटी (IIT) कोणाही माणसाला हेवा वाटेल अशी करियरची (Career) संधी देते. या आयआयटीमधील आयुष्य कसे असते यासंदर्भातील एक मजेदार फोटो एका आयआयटी, बॉम्बेच्या प्राध्यापकाने शेअर केला आहे.

Life at Indian Institute of Technology
आयआयटीमधील विद्यार्थ्यांचे आयुष्य 
थोडं पण कामाचं
  • आयआयटी (Indian Institute of Technology) या नुसत्या नावातच प्रचंड ग्लॅमर आणि यश
  • आयआयटीमधील आयुष्य कसे असते यासंदर्भातील एक मजेदार फोटो एका आयआयटी, बॉम्बेच्या प्राध्यापकाने शेअर केला
  • आयआयटीचे विद्यार्थी किती मेहनत करतात ते या एका फोटोतून दिसते

IIT Bombay Professor shares a pictures : मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी (Indian Institute of Technology) या नुसत्या नावातच प्रचंड ग्लॅमर आणि यश आहे.  भारतातील तुम्हा आम्हा, जवळपास प्रत्येकालाच या नावाची भुरळ पडलेली असते. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला की पुढचे आयुष्य आरामात जाणार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, आयुष्यभर वरच्या पदांवर काम करता येणार इत्यादी असंख्य स्वप्ने, आकांक्षा तरुणांना असतात. या सर्व मुद्द्यांमध्ये गैर काहीच नाही. आयआयटी (IIT) कोणाही माणसाला हेवा वाटेल अशी करियरची (Career) संधी देते. या आयआयटीमधील आयुष्य कसे असते यासंदर्भातील एक मजेदार फोटो एका आयआयटी, बॉम्बेच्या (Indian Institute of Technology, IIT Bombay) प्राध्यापकाने शेअर केला आहे. आयआयटीचे विद्यार्थी किती मेहनत करतात ते या एका फोटोतून दिसते. नेमके काय आहे या फोटोत ते पाहूया. (IIT Bombay, professor shared a picture of Ph.D. student showing the glimpse of tough life at IIT)

आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकाने शेअर केला फोटो

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी बॉम्बे (Indian Institute of Technology, IIT Bombay)ही देशातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. अनेक विद्यार्थी या जगप्रसिद्ध संस्थेत प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात आणि अनेकदा आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटते. त्या जीवनाची एक गंमतीशीर आणि विचार करायला लावणारी झलक IIT बॉम्बेचे प्राध्यापकाने शेअर केली आहे. त्याचे झाले असे की आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक अभिजित मजुमदार यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयआयटी बॉम्बेच्या प्रयोगशाळेतील दोन संशोधक दिसतात. हे दोन संशोधक म्हणजे पीएचडीचे विद्यार्थी किंवा पीएचडी स्कॉलर रविवारीही प्रयोगशाळेत बसलेले दिसत आहेत. संशोधनाच्या कामाला कंटाळलेल्या विद्यार्थ्याने प्रयोगशाळेतील फरशीलाच गादी बनवले आहे.

मुक्काम पोस्ट प्रयोगशाळा

हे खरंच IIT बॉम्बे जीवनातील वास्तव आहे का? बरं, असू शकतं. एका गंमतीशीर पोस्टद्वारे, आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक तेथे अभ्यास करण्यासाठी लागणारी मेहनत दाखवून सर्वांसोबत एक हलका क्षण शेअर करू इच्छित होते. या फोटोत आणखी एक आयआयटी बॉम्बे विद्यार्थी लॅपटॉपवर बसून काम करत असल्याचेही दिसते आहे. आयआयटी बॉम्बेच्या या प्राध्यापकाच्या ट्विटर पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "अभिजीत या खून-चूसिंग गाईडच्या हाताखाली पीएचडी करणाऱ्या बिचाऱ्या पीएचडी स्कॉलर अभिजीतला रविवारी रात्री देखील खोलीत जाण्याची संधी मिळत नाही आणि म्हणून तो त्याच्या वरिष्ठाच्या म्हणजे पंकजच्या गद्द्यावरच प्रयोगशाळेत झोपतो. मुंबईतील उन्हाळा आणि प्रयोगशाळेतील एसी हे तर फक्त निमित्त आहेत.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या फोटोने धमाल उडवून दिली आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक केले असून त्यावर कमेंटही केल्या आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की, "माझ्या पीएचडीच्या काळात मी याचा खूप आनंद घेतला. उन्हाळ्याच्या वीज बिलांपासून सुटका, आमच्याकडे झोपण्याची खुर्ची, बॅग आणि टीव्ही आणि सोफा असलेले जेवणाचे टेबल होते. माझे वरिष्ठ तिथे राहतात आणि माझी घरभाड्याची खूप बचत झाली. चांगले दिवस, तैवानमध्ये अनेकदा रात्रीच्या भूकंपाचा आनंद घेतो."

आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकाच्या तेथील पीएचडी स्कॉलरच्या पोस्टमुळे फक्त या अव्वल संस्थेतील खडतर जीवनाची झलक दिसली नाही तर मुंबईकरांना उन्हाळ्याच्या तीव्रतेचीही आठवण करून दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी