IIT Dhanbad water treatment technology : नवी दिल्ली : कारखान्यांमधून किंवा औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे सांडपाणी किंवा दूषित पाणी हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. यातून पर्यावरणाचे (Environment) प्रश्नदेखील निर्माण होत असतात. एका बाजूला होणारी पर्यावरणाची हानी तर दुसऱ्या बाजूला उत्पादन, विकास यासारख्या बाबींची आवश्यकता याच्या कात्रीत देशातीलच नव्हे जगभरातील कारखाने, औद्योगिक परिसर अडकलेले असतात. मात्र आता आयआयटी संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. आयआयटी धनबाद (IIT Dhanbad) येथील संशोधकांच्या टीमने एक नवे तंत्रज्ञान (New Technology) विकसित केले आहे. या नव्या तंत्रज्ञानाद्वारे कारखाने आणि खाणीतून बाहेर पडणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी शुद्ध करून ते वापरण्यायोग्य केले जाईल, असा दावा करण्यात आला आहे. आयआयटी-आयएसएमच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक ब्रिजेश कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे.(IIT Dhanbad researchers develops new technology for sewage water treatment)
अधिक वाचा : श्रीलंकेतील लोकांच्या भंयकर रागाचं नेमकं कारण घ्या समजून
या टीममध्ये रसायनशास्त्र विभागातील गणेश चंद्र नायक, डॉ. सोनालिका आणि अनेक संशोधन सहकारी यांचा समावेश आहे. प्रो. मिश्रा म्हणाले की, सलग तीन वर्षांच्या संशोधनानंतर टीमने गाईच्या शेणाच्या माध्यमातून असे निरीक्षण विकसित केले आहे, ज्याच्या मदतीने पाण्यात विरघळणारे जड घटक शोषले जाऊ शकतात.
एवढेच नाही तर या तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जा पुनर्संचयनासाठीही करता येतो. त्याला सोलर पॅनलने जोडून घरे, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे उजळून निघू शकतात. हे तंत्र ग्रामीण भागासाठी अधिक उपयुक्त ठरेल, जेथे मोठ्या प्रमाणात पशुपालक असल्याने शेण सहज उपलब्ध होते.
अधिक वाचा : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबायो राष्ट्रपती भवन सोडून पळाले, का निर्माण झाली एवढी भयंकर स्थिती?
कारखाने आणि खाणींमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील कॅडमियम, क्रोमियम, शिसे, निकेल, तांबे, झिंक असे सर्व हानिकारक घटक आणि रसायने या तंत्रज्ञानाद्वारे सहज वेगळे करता येतात, असे सांगण्यात आले. कापड, कागद, रंग यासह उद्योग आणि कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात सोडले जाणारे रासायनिक आणि प्रदूषित पाणी पर्यावरणासाठी एक मोठी समस्या आहे.
अधिक वाचा : ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत
गाईच्या शेणात असलेल्या फॉस्फरस, नायट्रोजन आणि कार्बनच्या मदतीने कारखान्यांचे घातक रासायनिक पाणी शुद्ध करणे शक्य झाले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान किफायतशीर आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणावरही दुष्परिणाम होत नाहीत. प्रो. मिश्रा यांच्या मते, हा संशोधन प्रकल्प 'स्वच्छ भारत मिशन' (Swachh Bharat Abhiyan) आणि 'गोवर्धन योजने'च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
आयआयटी ही भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थापैकी एक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये आयआयटी आहेत. आयआयटीमधून विविध इंजिनियरिंग क्षेत्रातील बुद्धिमान तरुणच बाहेर पडत नाहीत तर वेगवेगळ्या आयआयटीमधून वेगवेगळ्या स्वरुपाचे संशोधनदेखील होत असते. याचा समाजाला मोठाच फायदा होत असतो.