नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात (जुलै २०२१) देशात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात सर्वसाधारणच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे. IMD All India Weather Forecast Bulletin
महाराष्ट्रात ७ किंवा ८ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात तसेच सह्याद्रीच्या परिसरात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्याच्या पूर्वकडील भागात सर्वसाधारणच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे.