Weather Update: 'या' 10 राज्यांना IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या पावसाची परिस्थिती

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 23, 2022 | 07:15 IST

IMD weather update: IMD नं ट्विट केलं आहे की, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याशिवाय आसाम आणि मेघालयात आज म्हणजेच 23 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Rain Updates
महाराष्ट्रातील पावसाची स्थिती  
थोडं पण कामाचं
  • पूर्व राजस्थानमध्ये (Eastern Rajasthan) 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • 23 आणि 24 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
  • भारतीय हवामान विभाग (IMD) ने 'यलो अलर्ट' जारी करत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई: Monsoon update: देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. त्याचवेळी देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पावसानं थैमान घातलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्ते खचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.  भारतीय हवामान केंद्रानं (India Meteorological Center)  ट्विट केले की पूर्व उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh)  22, 23, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय पूर्व राजस्थानमध्ये (Eastern Rajasthan)  22 ते 24 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

IMD नं ट्विट केलं आहे की,  23 आणि 24 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याशिवाय आसाम आणि मेघालयात आज म्हणजेच 23 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. IMD च्या  अंदाजानुसार आज उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय 24 सप्टेंबर रोजी उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, 25 सप्टेंबर रोजी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  दरम्यान या राज्यांसाठी भारतीय हवामान विभाग (IMD) ने 'यलो अलर्ट' जारी करत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

अधिक वाचा-  KALYAN : मन हेलावणारी घटना ! अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

सफदरजंग वेधशाळेनुसार, सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 31.2 मिमी पावसाची नोंद झाली. त्याच वेळी, पालम, लोधी रोड, रिज आणि आयानगर वेधशाळांमध्ये अनुक्रमे 56.5 मिमी, 27.4 मिमी, 16.8 मिमी आणि 45.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

दिल्ली विद्यापीठ, जाफरपूर, नजफगढ, पुसा आणि मयूर विहारमध्ये अनुक्रमे 16.5 मिमी, 18 मिमी, 29 मिमी, 24.5 मिमी आणि 25.5 मिमी पाऊस पडला आहे. सफदरजंग वेधशाळेने सप्टेंबरमध्ये आतापर्यंत (गुरुवार सकाळपर्यंत) सरासरी  108.5 मिमी पावसाच्या तुलनेत 58.5  मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती 

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भात बऱ्याच तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसानं धुमाकूळ घातला होता.

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश भागात पावसाची मुख्यतः उघडीप राहणार आहे. मात्र विदर्भात पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यात या जिल्ह्यांना यलो अलर्ट 

भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया येथे शुक्रवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी