India Weather : भारतात 24 जानेवारीपासून थंडीची मोठी लाट येणार

IMD predicts rainfall and snowfall in India, cold wave grips and temperature drop in various parts of India :  भारतात मंगळवार 24 जानेवारी 2023 पासून थंडीची मोठी लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

India Weather
भारतात 24 जानेवारीपासून थंडीची मोठी लाट येणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात 24 जानेवारीपासून थंडीची मोठी लाट येणार
  • 3 दिवसांच्या काळात भारताच्या उत्तरेकडील मैदानी भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील
  • जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल

IMD predicts rainfall and snowfall in India, cold wave grips and temperature drop in various parts of India :  भारतात मंगळवार 24 जानेवारी 2023 पासून थंडीची मोठी लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल आणि थंडीची मोठी लाट येईल असे हवामान विभागाने सांगितले. 

पश्चिमेकडील प्रकोपामुळे महाराष्ट्रात 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. 

सोमवार 23 जानेवारी 2023 पासून बुधवार 25 जानेवारी 2023 पर्यंतच्या 3 दिवसांच्या काळात पश्चिमेकडील प्रकोपामुळे भारताच्या उत्तरेकडील मैदानी भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. उत्तर भारताच्या डोंगराळ भागात म्हणजेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल. पावसामुळे भारतात थंडीची मोठी लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला.

हिमाचल प्रदेशमधील चंबा, कांगडा, मंडी, कुल्लू, शिमला (सिमला), लाहौल-स्पीति, किन्नौर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाची तसेच हिमस्खलनाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर भारताच्या डोंगराळ भागात हिमवृष्टीचीही शक्यता  हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पाऊस आणि हिमवृष्टीमुळे भारताच्या मोठ्या भूभागात थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला.

IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सीरिजही जिंकली

Chandrashekhar Bawankule यांचं Pankaja Munde यांच्याबाबत मोठं विधान

मनालीत शनिवार 21 जानेवारी 2023 रोजी 12 सेमी, गोंडलात 11 सेमी, डलहौसीत 8 सेमी, कल्पात 7 सेमी तर तिस्सा, पूह आणि हंसा या 3 ठिकाणी प्रत्येकी 5 सेमी हिमवृष्टीची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पीति जिल्ह्यातील 182, कुल्लूतील 55, सिमल्यातील 32, किन्नौरमधील 29, मंडीतील 17, चंबातील 11, कांगडातील 2 रस्ते बंद झाले आहेत. स्थानिक प्रशासन बर्फ हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याच्या प्रयत्नात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी