हवामान खात्याची भविष्यवाणी, या वर्षी होणार चांगला पाऊस, शेतकऱ्यांना होणार फायदा 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 15, 2019 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

हवामान खात्याने २०१९ मध्ये सामान्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेती उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. 

Monsoon
यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली :  भारतात दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य मौसमी पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या संदर्भात हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे की, यंदा अल नीनोचा प्रभाव कमी झाल्याने पाऊस हा सामान्य म्हणजे सरासरी इतका होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खाते (आयएमडी) ने सोमवारी या संदर्भात आपला अंदाज वर्तविला आहे. त्यात त्यांनी मान्सून सामान्य असल्याचे सांगितले आहे. 

हवामान खात्यानुसार या अंदाजानुसार पाऊस ५ टक्के जास्त किंवा कमी होऊ शकतो. कमकुवत अल नीनोमुळे मान्सून सिझनमध्ये पाऊस चांगला होऊ शकतो.  सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २०१९ मध्ये देशात प्रत्येक भागात सरासरी इतकाच पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. सरासरी पेक्षा ७० टक्के पाऊस असल्यास देशातील शेतकरी संकटात येतो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार सरासरी पाऊस हा ९६ टक्के ते १०४ टक्क्यांदरम्यान असतो. याची सुरूवात जूनला सुरू होऊन संपूर्ण चार महिन्यात ८९ सेंटीमीटर पाऊस झाला तर तो सरासरी इतका मानला जातो. 

पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी सांगितले की, भारतात २०१९ मध्ये मान्सून सामान्य असणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत ९६ टक्के पाऊस पडणार आहे.  म्हणजे देशात ८९ सेंटीमीटर पावसाची शक्यता आहे. 

यापूर्वी चार एप्रिलला प्रायव्हेट हवामान अंदाज वर्तविणारी संस्था स्कायमेटने सांगितले की, भारतात या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हवामान खात्याची भविष्यवाणी, या वर्षी होणार चांगला पाऊस, शेतकऱ्यांना होणार फायदा  Description: हवामान खात्याने २०१९ मध्ये सामान्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेती उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. 
Loading...
Loading...
Loading...