रात्री घरी पोहचताच पत्नी होती प्रियकराच्या मिठीत, नवऱ्याला पाहताच म्हणाली, "यायला उशीर झाला"?

पूर्णिया येथील रौता येथे दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. पत्नी आणि प्रियकराला नकोत्या स्थितीत पाहिल्यानंतर दोघांनी दोरीने गळा आवळून पतीचा खून केला.

Immoral relationship with boyfriend exposed, husband strangled to death
रात्री घरी पोहचताच पत्नी होती प्रियकराच्या मिठीत, नवऱ्याला पाहताच म्हणाली, "यायला उशीर झाला"? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बोखलाईत पतीचा दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून
  • पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
  • आरोपी पत्नी सावित्री देवी पोलिसांच्या ताब्यात.

नवी दिल्ली : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील रौता पोलीस स्टेशन हद्दीतील चरकपाडा गावात अवैध संबंधांपुढे सात फेऱ्यांचे बंधन कलंकित झाले. तिथल्या दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा दोरीने गळा आवळून खून केला. पतीने पत्नीला घरात प्रियकरासह नकोत्या स्थितीत पाहिल्याने ही घटना घडली. (Immoral relationship with boyfriend exposed, husband strangled to death)

अधिक वाचा : Encounter Live Video: पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर हल्ला करण्याचा डाव, सुरक्षा दलाने दहशतवाद्याला पळवून-पळवून मारलं

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. रौता पोलीस ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र राणा यांनी सांगितले की, दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. या संदर्भात मृताच्या वडिलांच्या अर्जावरून पत्नी सावित्री देवी आणि तिचा प्रियकर अरविंद महालदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्वरीत कारवाई करत पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली, तर प्रियकर सध्या गावातून फरार आहे.

अधिक वाचा :  Crime | धक्कादायक! 11 वर्षांचा मुलगा का झाला खूनी? स्वतःच सांगितली 4 वर्षाच्या निरपराध मुलाच्या हत्येची कहाणी...नागरिकांमध्ये भीती

मृत पोशनकुमार दास याचे वडील योगेंद्र दास यांनी सांगितले की, त्यांची सून सावित्री देवी हिचे गावातील अरविंद महालदार याच्याशी अनेक दिवसांपासून अवैध संबंध होते. यामुळे  पोशनकुमार दास याच्याशी अनेकदा भांडण होत असे. वादामुळे निराश झालेला त्यांचा मुलगा पोशनकुमार दास अनेकदा बाहेर असायचा. यापूर्वीही त्यांनी सुनेला अरविंद महालदार यांच्यासोबत अनेकदा पकडून समजावण्याचा प्रयत्न केला होता.

अधिक वाचा : तिहार तुरुंगातील दोन गटांमध्ये राडा, हाणामारीत 15 कैदी जखमी

मंगळवारी रात्री गावात अष्टयमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री अकराच्या सुमारास पोशनकुमार अष्टम पाहून घरी आला. तेव्हात घरात अरविंद महालदार यांच्यासह पत्नी सावित्रीदेवी नकोत्या अवस्थेत दिसली. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यावर पत्नी सावित्री देवीसह प्रियकर अरविंद महालदार यांनी त्याची हत्या केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी