UGC NET Result 2022: यूजीसी नेट रिझल्ट कधी जाहीर होणार, IMP Update

important update about UGC NET Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए घेतलेल्या यूजीसी नेट परीक्षेला बसलेले विद्यार्थी रिझल्टची (निकाल) वाट बघत आहे.

important update about UGC NET Result 2022
UGC NET Result 2022: यूजीसी नेट रिझल्ट कधी जाहीर होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • UGC NET Result 2022: यूजीसी नेट रिझल्ट कधी जाहीर होणार
  • असा बघा निकाल
  • UGC NET Answer Key 2022 : आन्सर की

important update about UGC NET Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए घेतलेल्या यूजीसी नेट परीक्षेला बसलेले विद्यार्थी रिझल्टची (निकाल) वाट बघत आहे.  यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आहे. एनटीए यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. 

यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होईल. परीक्षा देणारा विद्यार्थी त्याचा अॅप्लीकेशन नंबर आणि जन्मतारीख यांची नोंद करून निकाल बघू शकेल.

यंदाच्या वर्षी यूजीसी नेट 2022 परीक्षा 4 टप्प्यात झाली. पहिला टप्पा 9 जुलै 12 जुलै 2022 या काळात पार पडला. दुसरा टप्पा 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2022 या काळात झाला. तिसरा टप्पा 29 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीत झाला. तर चौथा टप्पा 8 ते 14 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पूर्ण झाला. परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने झाली. 

मीडिया रिपोर्टनुसार निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. निकाल कोणत्या दिवशी किती वाजल्यापासून उपलब्ध या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल. तसेच संबंधित दिवशी, संबंधित वेळेवर यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होईल.

असा बघा निकाल

  1. ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन UGC NET December 2021 and June 2022 Result वर क्लिक करा. 
  2. योग्य त्या रकान्यात परीक्षा देणाऱ्या व्यक्तीचा अॅप्लीकेशन नंबर आणि जन्मतारीख नमूद करून आणि इतर आवश्यक माहिती देऊन सबमिट या बटणावर क्लिक करा.
  3. NTA UGC NET Result 2022 बघू शकता आणि डाऊनलोड करू शकता. 

Aai kuthe kay karate : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट, यश-गौरीच्या नात्यात कायमचा दुरावा?

Breathe 2 Trailer Out: अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल थ्रीलर वेबसीरिजचा trailer Out, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्सचा तडका

UGC NET Answer Key 2022 : आन्सर की

यूजीसी नेट 2022 परीक्षेच्या पहिल्या 3 टप्प्यांची आन्सर की 18 ऑक्टोबर 2022 आणि चौथ्या टप्प्याची आन्सर की 21 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आली. परीक्षा देणाऱ्यांना आन्सर की बघून त्यांचे आक्षेप 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत नोंदविण्यास सांगण्यात आले होते. आता फायनल आन्सर की आणि यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. मीडिया रिपोर्टनुसार यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल आणि फायनल आन्सर की नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी