इस्लामाबाद : पाकिस्तानाचे (Pakistan) माजी पंतप्रधान (Former Prime Minister) इमरान खान (Imran Khan) यांच्यामुळे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) कौतुक होऊ लागलं आहे. इतकेच नाहीतर इमरान खान यांना मोदींचा आदर्श घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या विरोधात सौदी अरेबियात घोषणाबाजी केल्याप्रकरणी इमरान खान यांच्यासह १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू इमरान खान यांनी विकल्याचा आरोप केला जात आहे.
त्यावरुन इमरान खान यांना पंतप्रधान मोदींचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला जात आहे. पंतप्रधान असताना इमरान खान यांना मिळालेल्या भेटवस्तू १४ कोटी २० लाख रुपयांना विकल्याचा आरोप पाकच्या नव्या सरकारच्यावतीनं करण्यात आला आहे. इमरान खान यांनी सरकारी भेटवस्तू विकल्याचं समोर आल्यानं पाकिस्तानात त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श इमरान खान यांनी घ्यावा, असा सल्ला देखील दिला जात आहे.
इमरान खान पंतप्रधानपदी असताना त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विक्रीप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. शाहबाज शरीफ यांच्या सरकारकडून इमरान खान यांच्याकडे भेटवस्तूंच्या विक्रीचा हिशोब मागण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना इमरान खान यांना सरकारी मानधन म्हणून १४ कोटी १० लाख रुपये मिळाले होते. तर, भेटवस्तू विक्रीतून त्यांना १४ कोटी २० लाख मिळाले होते. यावरुन इमरान खान यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे.
Read Also : शाळेच्या फीमध्ये मिळणार 15 टक्के सवलत- शिक्षण विभागाचे आदेश
पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर करत आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वीनगास यांनी नरेद्र मोदींचा हा व्हिडीओ इमरान खान यांनी नक्की पाहायला पाहिजे, असं म्हटलं आहे. भारताचे पंतप्रधान त्यांना भेटवस्तू मिळतात त्यावेळी ते त्याचा लिलाव करतात आणि त्यातून मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतात, असं त्यांनी म्हटलंय. तर, पाकिस्तानचे पत्रकार नसरुल्ला मलिक यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. मलिक यांच्या ट्विटला अनेकांनी रीट्विट केलं आहे.
नरेंद्र मोदी त्या व्हिडिओत गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला सोने आणि चांदीच्या भेटवस्तू मिळायच्या पण मी त्या घेत नसे. त्या भेटवस्तू सरकारी खजिन्यात जमा करत असे म्हणतात. पुढे त्या भेटवस्तूंचा लिलाव सुरु केला होता. त्यातून मिळणारे पैसे मी मुलींच्या शिक्षणासाठी दिल्याचं मोदींनी म्हटल्याचा त्या व्हिडिओत उल्लेख आहे. नरेंद्र मोदींनी त्या व्हिडिओत १०० कोटी रुपये मुलींच्या शिक्षणासाठी दिल्याची माहिती दिली आहे.