बलात्कारावर वक्तव्य करून अडकले इमरान खान, झाले भरपूर ट्रोलिंग, माजी पत्नीनेही सुनावले खडे बोल

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2021 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

मानवाधिकार कार्यकर्त्या मिनी गबीना यांनी म्हटले आहे, 'मी खात्रीपूर्वक सांगू शकते की एक दिवस मोठ्या संख्येने महिला पुढे येतील आणि इमरान खान यांच्यावर लैंगिक छळ, इतकेच नव्हे, तर बलात्काराचाही आरोप करतील.’

Imran Khan
बलात्कारावर वक्तव्य करून अडकले इमरान खान, झाले भरपूर ट्रोलिंग, माजी पत्नीनेही सुनावले खडे बोल 

थोडं पण कामाचं

  • लैंगिक अपराधांना समाजातील वाढती अश्लीलता जबाबदार- इमरान
  • या वक्तव्यानंतर महिलांनी केला कडवा विरोध, माजी पत्नीनेही केली टीका
  • सोशल मीडियावर इमरान यांना केले ट्रोल, महिलांनी म्हटले, अशी विचारसरणी घातक

इस्लामाबाद: देशातील (Country) वाढत्या महागाईमुळे (price hikes) आधीच लोकांच्या नाराजीचा (displeasure) सामना करणाऱ्या पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान (Prime Minister) इमरान खान (Imran Khan) यांना ट्रोलिंगचा (trolling) सामना करावा लागत आहे. बलात्काराच्या (rape) वाढत्या प्रकरणांना समाजातील (society) वाढती अश्लीलता (obscenity) जबाबदार असल्याच्या त्यांच्या वक्तव्यानंतर (comment) त्यांच्यावर सोशल मीडियावर (social media) टीकेची झोड उठली आहे. यावर अनेक मीम्स (memes) तयार होत आहेत, अनेकांनी परदेशी लोकांसोबत (foreign citizens) पाश्चिमात्य पेहरावात (western attire) आपले फोटो (photo) शेअर (share) केले आहेत.  

बलात्कारासाठी अश्लीलता जबाबदार असल्याचे वक्तव्य

नुकताच इमरान खान यांनी दूरध्वनीवरून देशवासियांशी संवाद साधला ज्यात ते म्हणाले, 'इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा अश्लीलता वाढते तेव्हा लैंगिक अपराध वाढतात आणि कौटुंबिक संरचना ढासळते.' त्यांचे हे विचार समोर येताच पाकिस्तानी पत्रकार रीमा उमर यांनी इमरान यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे, 'बलात्काराचा संबंध अश्लीलतेशी जोडणाऱ्या इमरान खान यांचे वक्तव्य त्यांचे अज्ञान दर्शवते. हे वक्तव्य घातक आणि निंदनीय आहे.'

इमरान खान यांचे या वक्तव्याबद्दल ट्रोलिंग

रीमा यांनी पुढे म्हटले आहे, 'बलात्काराबद्दल त्यांचे हे विचार असे दाखवतात की त्यांना या वाईट गोष्टीची काहीही समज नाही. हे वक्तव्य पीडितेला जबाबदार ठरवत अपराध्यांना संरक्षण देते.' एका सोशल मीडिया यूजरने म्हटले आहे, 'आपल्याला इमरान खान यांना थोडी विश्रांती देण्याची गरज आहे कारण त्यांना जे सांगितले जात आहे तेच ते करत आहेत. त्यांचे याआधीचे आयुष्य सांगते की ते किती सुखी जीवन जगले आहेत.'

माजी पत्नी जेमिमा यांनीही केली जोरदार टीका

मानवाधिकार कार्यकर्त्या मिनी गबीना यांनी म्हटले आहे, 'मी खात्रीपूर्वक सांगू शकते की एक दिवस मोठ्या संख्येने महिला पुढे येतील आणि इमरान खान यांच्यावर लैंगिक छळ, इतकेच नव्हे, तर बलात्काराचाही आरोप करतील. अशी मानसिकता असलेले लोक स्वतःच गुन्हेगार आहेत.’ या वक्तव्याबद्दल पाकिस्तानचा कायदेविषयातील समूह, मानवाधिकार आणि महिला अधिकार समूहांनी इमरान यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी हे वक्तव्य तथ्यात्मकरित्या चुकीचे, असंवेदनशील आणि घातक असल्याचे म्हटले आहे. इमरान खान यांची भूतपूर्व पत्नी जमीमा गोल्डस्मिथ यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, 'यासाठी महिला नाही, तर पुरुष जाबाबदार आहेत. पुरुषांनी आपल्या नजरेवर नियंत्रण ठेवावे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी