नवी दिल्ली : प्रदूषणामुळे (Pollution) आणि वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global warming) हिमालयातील ग्लेशियर ४० वर्षांत ३.९ लाख हेक्टर क्षेत्रावरून कमी झाल्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियर (Glacier) झपाट्याने वितळत आहेत. विशेषतः लहान हिमनद्यांवर त्याचा परिणाम अधिक दिसून येत आहे. चार दशकांपूर्वीपर्यंत हिमालयातील ग्लेशियर क्षेत्रफळ ३ दशलक्ष हेक्टर होते. 2002 पासून हिमाचल प्रदेशातील ग्लेशियर संशोधन करणाऱ्या धर्मशाला केंद्रीय विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अनुराग यांनी ही माहिती दिली.
जेएनयूच्या छोट्या शेगडी ग्लेशियरवर पीएचडी करण्यारे डॉ. अनुराग यांनी सांगितलं की, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दोन स्क्वेअर किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रात पसरलेल्या छोट्या ग्लेशियरवर जास्त होतो. हे ग्लेशियर वेगाने तुटत आहेत आणि वितळत आहेत. डॉ. अनुराग यांनी सांगितले की, सिक्कीम ते काश्मीरपर्यंत संपूर्ण हिमालयात सुमारे 9,575 ग्लेशियर आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व ग्लेशियर नकारात्मक द्रव संतुलन दर्शवत आहेत, ज्यामुळे ते अधिक वितळत आहेत, त्यामुळे त्यांचे क्षेत्र कमी होत आहे. हिमाचलमधील चंबा जिल्ह्यात 90 टक्के लहान (ग्लेशियर) हिमनद्या आहेत, तर लाहौल-स्पीती आणि किन्नौर या आदिवासी जिल्ह्यांमध्ये 50-50 लहान ग्लेशियर आहेत.
हिमनद्या फक्त भारतातील हिमालयीन प्रदेशात आढळतात. हे हिमनद्या पूर्वेला सिक्कीम, मध्यभागी असलेल्या हिमाचल आणि उत्तराखं, पश्चिमेतील काश्मीर मध्ये ग्लेशियर आहेत.
ग्लेशियरवर पीएचडी केलेले डॉ.अनुराग म्हणाले की, हिमनद्या वाचवण्यासाठी शाश्वत विकासावर भर देण्याची गरज आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने चालवणे, जंगलातील झाडे तोडणे थांबवणे, जंगलातील वणवे रोखणे, उद्योगधंद्यांचा धूर आणि प्रदूषण थांबवणे, झाडे लावणे यावर भर द्यावा लागणार आहे.
हिमालयीन प्रदेशातील बहुतेक ग्लेशियरचे पाणी फक्त नद्या आणि नाल्यांमध्ये जाते. लाहौलमध्ये चंद्रा आणि भागा नद्यांव्यतिरिक्त ९० टक्के पाणी नाल्यांमध्ये जात आहे. मात्र, भौगोलिक परिस्थितीमुळे मार्च-एप्रिलमध्ये हिमनद्या वितळल्याने अनेक ठिकाणी सरोवरे तयार होतात, हा निसर्गाचा नियम आहे.