Flight door open | बापरे! उडत्या विमानाचा अचानक उघडला दरवाजा...प्रवाशांची हिंमत आणि आकाशातील थरार, ताजी घटना

Brazil Flight : तुम्ही जरा कल्पना करा की तुम्ही एका विमानात बसला आहात आणि ते विमान उड्डाण (Flight)घेत हवेत झेपावले आहे. तुमचे विमान हजारो फूट उंचीवर आहे आणि अचानक तुमच्या विमानाचा दरवाजाच उघडला तर...बसल्या जागीच पोटात गोळा आला ना? तुमचे विमान हजारो फूट उंचीवर आहे आणि अचानक तुमच्या विमानाचा दरवाजाच उघडला तर...बसल्या जागीच पोटात गोळा आला ना? असाच जीवाचा थरकाप करणारा अनुभव ब्राझिलमधील (Brazil)काही प्रवाशांनी घेतला आहे.

Brazil flight story
आकाशात विमान असतानाच उघडला दरवाजा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जीवाचा थरकाप करणारी ब्राझिलमधील विमान प्रवासाची घटना
  • हे विमान आकाशात उंचावर होते, तेव्हा अचानक त्याचे गेट उघडले
  • विमानातील काही प्रवाशांनी दाखवले हिंमत, आकाशातील थरार

Rio Branco flight story : रिओ ब्रॅंको  : विमान प्रवास (Air travel) करण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का? पण तुम्ही जरा कल्पना करा की तुम्ही एका विमानात बसला आहात आणि ते विमान उड्डाण (Flight)घेत हवेत झेपावले आहे. तुमचे विमान हजारो फूट उंचीवर आहे आणि अचानक तुमच्या विमानाचा दरवाजाच उघडला तर...बसल्या जागीच पोटात गोळा आला ना? असाच जीवाचा थरकाप करणारा अनुभव ब्राझिलमधील (Brazil)काही प्रवाशांनी घेतला आहे. विमान प्रवासात प्रवाशांच्या आरामदायी आणि आलिशान सुविधांच्या अपेक्षा असतात, मात्र काहीवेळा घडते नेमके याच्या विरुद्ध.  नुकतेच एका विमानातून ब्राझीलला जाणारे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे विमान हवेत होते, तेव्हा अचानक त्याचे गेट (flight door open) उघडले. त्यानंतर जे घडले ते थक्क करणारे होते. (In a horrifying story flight door was opened while the flight was in air, passengers show presence of mind) 

अधिक वाचा : Cyber security breach: लष्कराच्या सायबर सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा संशय; अनेक अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 

विमान प्रवासाचे आकर्षण सर्वांनाच असते. एरवी बहुतांश उड्डाणे सुरक्षितपणे होत असताना विमान प्रवासातील जोखीम नजरेआड करून चालत नाही. विमानाचे अपघात हे जीवघेणेच असतात. विमानाला आग लागणे, विमान कोसळणे, इंजिनात बिघाड होणे यासारख्या घटना समोर येत असतात. उडत्या उड्डाणांशी संबंधित अशा धक्कादायक घटना समोर येतात ज्यांची खूप चर्चा होते. प्रवासी जरी निश्चितपणे फ्लाइटमध्ये आराम आणि आलिशान घटक यांची अपेक्षा बाळगून असले तरी कधीकधी त्यांची फसवणूक होते.

अधिक वाचा : Bangalore Wife obscene pictures: पतीची ती मागणी पूर्ण न केल्यानं नवऱ्यानं व्हायरल केले पत्नीचं 'ते' फोटो

ब्राझिलमधील जीवाचा थरकाप करणारा प्रसंग

विमान प्रवासाची धडकी भरवणारी  ही घटना ब्राझीलमधील (Brazil)एका शहरातील आहे. मेट्रोने दिलेल्या ऑनलाइन वृत्तानुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते आकाशात असताना ही घटना घडली. हे विमान खूपच लहान होते आणि त्यात फक्त 12 लोक बसले होते. मात्र तरीही हा भीतीदायक प्रसंग वाचणाऱ्यांच्याही अंगावर काटा आणणारा आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार हे विमान रिओ ब्रँकोमध्ये (Rio Branco) उतरणार होते. रिओ ब्रॅंको हे ब्राझिलमधील एक छोटेसे शहर आहे. हे विमान खूप उंचीवर असताना अचानक विमानाचा दरवाजा उघडल्याचे प्रवाशांना दिसले.

अधिक वाचा : Afghanistan School Explosion :अफगाणिस्तानमध्ये शाळेत तीन स्फोट, ५ते ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

दोन प्रवाशांच्या हिंमतीने वाचला सर्वांचा जीव

प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या मंगळवारी घडली. विमान आकाशात उडत असतानाच या विमानाचा दरवाजा उघडताच प्रवासी प्रचंड घाबरले. मात्र यादरम्यान विमानात बसलेल्या दोन प्रवाशांनी प्रचंड हिंमत आणि धैर्य दाखवले. हे दोन जिगरबाज प्रवासी त्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या सीटवरून उठले आणि त्यांनी दोन्ही बाजूंनी गेट पकडले. सुदैवाने काही वेळातच गेट बंद झाले. यानंतर विमान सुखरूप उतरल्यावर विमानाचा दरवाजा दुरुस्त करण्यात आला. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. या दोन हिंमतबाज प्रवाशांमुळेच विमानातील सर्वांचा जीव वाचला आहे. कारण हवेत विमान असताना हवेचा दाब प्रचंड असतो आणि त्यामुळे विमानाचे संतुलन बिघडत ते कोसळू शकले असते. आता एवढ्या उंचीवर विमान कोसळल्यावर त्यातील कोणीही जिवंत राहिले नसते हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच.

समोर आलेल्या माहितीनुसार सपोर्ट केबल तुटल्यामुळे विमानात ही घटना घडल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. या घटनेनंतर विमानाच्या पायलटने इंजिन बंद केले आणि सुरक्षित लँडिंग झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी