Chandigarh Chhole Bhature: चंदीगड : कुटुंबासह किंवा मित्रमंडळीसह जेवणासाठी किंवा स्नॅक्स खाण्यासाठी रेस्टॉंरटमध्ये जायला सर्वानाच आवडते. किंबहुना अलीकडे अनेकांसाठी ही एक नियमित बाब झाली आहे. मात्र बाहेरचे अन्न खाताना आपण सावध असले पाहिजे नाहीतर तुमच्या जीवावरदेखील बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना चंदीगढमध्ये (Chandigarh) घडली आहे. चंदीगडमधील एका प्रसिद्ध दुकानाच्या जेवणात मंगळवारी एक सरडा सापडल्याची (Lizard found in Chhole Bhature) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर चंदीगडच्या आरोग्य विभागाने त्याच रात्री अन्नाचे नमुने गोळा केले. (In a shocking incident a lizard found in 'Chhole Bhature' at Nexus Elante Mall in Chandigarh)
ही घटना चंदीगडमधील नेक्सस एलांते मॉल येथील सागर रत्न आउटलेटमध्ये (Sagar Ratna's 'Chhole Bhature') मंगळवारी रात्री घडली. रात्री दहाच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना एका ग्राहकाला 'छोले भटुरे'च्या ताटात हा सरपटणारा प्राणी आढळून आला. योगायोगाने हा ग्राहक एक डॉक्टर होता. ग्राहकाने तत्काळ आरोग्य विभागाचे पथक आणि पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, ग्राहकाने कोणतीही लेखी तक्रार केली नाही. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने रेस्टॉरंटमध्ये जाऊन अन्नाचे नमुने गोळा केले.
अधिक वाचा : pm modi gujarat visit, पावागड शक्तिपीठ महाकाली मंदिरावर शेकडो वर्षांनी ध्वजारोहण, पीएम मोदी करणार ध्वजारोहण
"नमुने अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत आणि पुढील 15 दिवसांत अहवाल येतील. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल," असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मंगळवारी, Elante च्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की त्यांना परिसरात घडलेल्या घटनेची माहिती आहे. "ग्राहकांसाठीची स्वच्छता आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा घटना टाळता येतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू. फूड कोर्टातील सखोल अन्न सुरक्षा ऑडिटमध्ये अधिकाऱ्यांना मदत करू," असे अहवालात प्रवक्त्याने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने (AMC) मॅकडोनाल्डचे आउटलेट एका ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या कोल्ड ड्रिंकच्या ग्लासमध्ये सरडा सापडल्यानंतर सील केले होते. कोल्ड्रिंकमधील सरड्याचे छायाचित्र भार्गव जोशी या ग्राहकाने शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केली होती.
दिवसेंदिवस लोकांमध्ये बाहेरचे अन्न खाण्याचा कल वाढतो आहे. हौसमधून किंवा गरज म्हणून रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायला अनेकांना आवडते. अशावेळी आरोग्यासंदर्भात आणि बाहेरील अन्नासंदर्भात सावध राहण्याची आवश्यकता आहे.