Smartphone Craze : स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 16 वर्षांची मुलगी रक्त विकण्यासाठी पोचली रक्तपेढीत आणि मग घडला हा प्रकार...

Smartphone craze : स्मार्टफोनबाबत तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ (Smartphone Craze)आहे. नवीन स्मार्टफोन घेण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. पश्चिम बंगालमध्ये स्मार्टफोनच्या क्रेझमुळे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 16 वर्षीय किशोरवयीन मुलगी आपले रक्त विकण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पोचली. घरातील लहान मुलांमध्येदेखील किंवा किशोरवयीन मुलांमध्येदेखील स्मार्टफोनचे प्रचंड आकर्षण आहे.

Smartphone craze
स्मार्टफोन क्रेझ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्मार्टफोनची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ
  • बंगालमधील एक धक्कादायक घटना
  • स्मार्टफोनसाठी मुलगी निघाली रक्त विकायला

Smartphone Craze : नवी दिल्ली : सध्याच्या या डिजिटल जमान्यात स्मार्टफोनचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो. अनेक कामेदेखील स्मार्टफोनचा (Smartphone) वापर करून केली जातात. साहजिकच घरातील लहान मुलांमध्येदेखील किंवा किशोरवयीन मुलांमध्येदेखील स्मार्टफोनचे प्रचंड आकर्षण आहे. स्मार्टफोनबाबत तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ (Smartphone Craze)आहे. नवीन स्मार्टफोन घेण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. पश्चिम बंगालमध्ये स्मार्टफोनच्या क्रेझमुळे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 16 वर्षीय किशोरवयीन मुलगी आपले रक्त विकण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पोचली. त्यामागे कारण असे होते की तिला रक्त विकून स्वत:साठी स्मार्टफोन घ्यायचा होता. ही माहिती रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता CHILDINE ला कळवले. त्यानंतर जिल्हा कल्याण लिमिटेडने या किशोरवयीन मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर तिला तिच्या पालकांकडे पाठवण्यात आले. (16 year old girl goes to sale her blood for smartphone)

अधिक वाचा : न थांबता 13 हजार 560 किमी उड्डाण करून पक्ष्याचा विश्वविक्रम

नेमके काय झाले

बालूरघाट जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील समुपदेशक कनक कुमार दास यांनी यासंदर्भात माहिती दिली की, "ही मुलगी सकाळी 10 वाजता आमच्या घरी आली. सुरुवातीला आम्हाला वाटले की ती रक्त घेण्यासाठी आली आहे, पण तिला रक्त विकायचे आहे असे तिने सांगताच हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. स्टाफला वाटले की तिला तिच्या भावाच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे आहेत, म्हणून रक्त विकायचे आहे. त्यानंतर आम्ही तिच्याशी काही वेळ बोललो. त्यानंतर तिने स्मार्टफोन मिळवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा खुलासा केला.

अधिक वाचा : टाटा एअरबस गुजरातमध्ये गेल्यानंतर CM शिंदेंची सावध भूमिका 

स्मार्टफोनची ऑनलाइन ऑर्डर 

मुलीने सांगितले की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल मागवला आहे. त्याची किंमत चुकवण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या तपन नावाच्या ठिकाणाहून ही मुलगी बालूरघाटात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि तिची आई गृहिणी आहे. या मुलीला लहान भाऊ देखील आहे जो चौथीच्या वर्गात शिकतो. मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चाइल्डलाइनला 1098 या क्रमांकावर माहिती दिली. त्यानंतर समुपदेशक रिता महतो तेथे पोचले आणि त्यांनी मुलीशी चर्चा केली.

अधिक वाचा : 'गोल्डन पॅराशूट'मुळे पराग अग्रवालला मस्ककडून मिळणार अब्जावधी

वडीलांना माहित नाही

मुलीने महतोला सांगितले की तिने 9000 रुपयांना स्फार्टफोन मागवला होता. या फोनची डिलिव्हरी गुरुवारी होणार होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ती बाहेर आली तेव्हा मी घरी नव्हतो. मुलीच्या रक्त विकण्याच्या प्रकाराने तिच्या घरच्यांना मोठाच धक्का बसला कारण त्यांना यासंदर्भात काहीच महिती नव्हती.

दिवसेंदिवस मोठ्या संख्येने स्मार्टफोन लोकांवर पोचत आहेत. आता अगदी खेडोपाडीदेखील स्मार्टफोनचा वापर सुरू झाला आहे. आगामी काळात स्मार्टफोनचा वापर अनेक कामांसाठी होणार असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी