Coronavirus in US: अमेरिकेत एका महिन्यात २ लाख ७० हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात

कोरोनाच्या संसर्गचा प्रभाव कमी झाल्यानंतर नागरिक कोरोनाचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा करत आहेत. परंतु, हा निष्काळजीपणाच अमेरिकेला सध्या भोवताना दिसून येत आहे. 'अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स' (AAP) आणि 'चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशन'च्या एका अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Coronavirus in US
अमेरिकेत एका महिन्यात २ लाख मुलं कोरोनाच्या विळख्यात   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गचा प्रभाव कमी झाल्यानंतर नागरिक कोरोनाचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा करत आहेत. परंतु, हा निष्काळजीपणाच अमेरिकेला सध्या भोवताना दिसून येत आहे. 'अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स' (AAP) आणि 'चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशन'च्या एका अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत जवळपास गेल्या महिन्याभरात जवळपास २ लाख ७० हजार लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.  

सिन्हुआ' वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, देशात गेल्या दोन वर्षांच्या काळात जवळपास १.२८ कोटी मुलं कोरोना संक्रमित आढळली आहेत. रिपोर्टनुसार, १९ टक्के मुलं करोना पॉझिटिव्ह आढळलेत.  गेल्या चार आठवड्यांत जवळपास २,७०,००० करोना संक्रमित लहान मुलांची नोंद करण्यात आली आहे. १७ मार्च रोजी समाप्त झालेल्या गेल्या आठवड्यात एकूण ३१,९९१ मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत ७७ लाखांहून अधिक लहान मुलं कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आली आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी