Pope Francis accepts invitation to visit India: जी-20 मध्ये पंतप्रधान मोदींनी दिला 'वन अर्थ-वन हेल्थ' चा मंत्र; भारताच्या दौऱ्यासाठी पोप उत्सुक

Pope Francis accepts invitation for India tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जी20 (G-20) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इटली (Italy Tour) दौऱ्यावर गेले आहेत.

In G-20, Prime Minister Modi gave the mantra of 'One Earth-One Health
भारताच्या दौऱ्यासाठी पोप उत्सुक   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पोप फ्रान्सिस आणि पीएम मोदी यांची ही पहिली भेट
  • कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं, One Earth, One Health (एक विश्व, एक आरोग्य व्यवस्था) हा दृष्टीकोन अंमलात आणावा - पंतप्रधान मोदी
  • पुढील वर्षाच्या अखेरीस भारत लसीचे ५ अब्ज (५०० कोटी) डोस तयार करण्यास तयार

Pope Francis accepts invitation for India tour : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जी20 (G-20) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इटली (Italy Tour) दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची ही आठवी बैठक आहे. या वर्षीची G20 देशांची बैठक ही इटलीतील रोममध्ये होत आहे. इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी शनिवारी प्रथम वेटिकन शहरात दाखल झाले. येथे त्यांनी पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची भेट घेतली. दरम्यान पोप फ्रान्सिस आणि पीएम मोदी यांची ही पहिली भेट होती. साधरण एक तास चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. याविषयी परराष्ट्र मंत्रालयाने एक विधान जारी करत सांगितले की, पोप फ्रांसिस यांनी भारत भेटीचे आमंत्रण स्विकारले आहे.(Pope Francis accepts invitation for India tour )

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 देशांच्या बैठकीला संबोधन केलं. यावेळी त्यांनी जगासमोर असलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं, One Earth, One Health (एक विश्व, एक आरोग्य व्यवस्था)  हा दृष्टीकोन अंमलात आणावा असं मत मांडलं. या बैठकी दरम्यान पंतप्रधान मोदी आणि कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेटी झाली या भेटी दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे देखील त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्यावर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून पोप फ्रान्सिस भारतात येणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी सांगितले, "पोपने पंतप्रधानांचे निमंत्रण स्वीकारले आहे आणि ते माझ्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही, मी निश्चितपणे भारतात येईन, असे पोप निमंत्रण स्विकारताना म्हणाले आहेत." 

पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला कोरोना आणि आरोग्याचा मुद्दा 

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, "G20 मधील आजची कार्यवाही सर्वसमावेशक आणि फलदायी होती. 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या संकल्पनेवर, मी कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्यात भारताच्या योगदानाबद्दल बोललो, आरोग्यसेवेतील नाविन्यपूर्ण प्रगती, यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकला. जागतिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची गरज.

जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांची घेतली भेट 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी G20 च्या निमित्ताने रोममध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली. परराष्ट्र सचिवांनी ट्विट करत सांगितले, "अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांसोबत खूप चांगली बैठक झाली. आमच्या भागीदारीशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. महत्त्वाच्या प्रादेशिक समस्यांवर एकमेकांना अपडेट केले." जरी G20 च्या पहिल्या बैठकीत आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले गेले तरी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी या बैठकीत जागतिक ऊर्जा संकटावर पडदा टाकल्याची माहिती दिली. पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदींनी कोविड 19 विरुद्धच्या लढाईत भारताच्या योगदानावर प्रकाश टाकला. मोदींनी 150 हून अधिक देशांना भारताच्या वैद्यकीय पुरवठ्याचा उल्लेख केला आणि एक पृथ्वी, एक आरोग्य या आमच्या व्हिजनबद्दल सांगितले.  जे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सहयोगी दृष्टीकोन प्रतिबिंबित करते. जी-20 मधील जागतिक नेत्यांनी त्याचे स्वागत केले.  

पुढील वर्षाच्या अखेरीस लसीच्या 500 कोटी डोसचे उत्पादन

श्रृंगला यांनी माहिती दिली की, पंतप्रधान मोदींनी G20 देशांना भारताला आर्थिक सुधारणा आणि पुरवठा साखळी विविधीकरणात भागीदार बनवण्यासाठी आमंत्रित केले. महामारीच्या आव्हानांना न जुमानता विश्वासार्ह पुरवठा साखळींच्या बाबतीत भारत एक विश्वासार्ह भागीदार राहिला हेही त्यांनी पुढे सांगितले. पुढील वर्षाच्या अखेरीस भारत लसीचे ५ अब्ज (५०० कोटी) डोस तयार करण्यास तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  आमचा असा विश्वास आहे की WHO चे EUA लसीला मान्यता देऊन इतर देशांना मदत करण्याचा मार्ग खुला करेल, असेही मोदी म्हणाले.

सिंगापूरच्या पंतप्रधानांशी हवामान बदलावर चर्चा

श्रृंगला म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सिंगापूरच्या पंतप्रधानांशी हवामान बदलावरील जागतिक प्रयत्नांवर चर्चा केली. कोविड महामारी आणि लसीकरणावरही चर्चा झाली. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी भारतातील जलद लसीकरण मोहिमेबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

उद्घाटन सत्र जागतिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर केंद्रित होते

20 राष्ट्रप्रमुखांच्या गटाच्या उद्घाटन सत्रात जागतिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यासोबतच कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर काही प्रमुख नेत्यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत आगामी पावलांवरही चर्चा केली.  या शिखर परिषदेचे आयोजक इटलीने अपेक्षा केली, G20 देश रविवारी ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या जागतिक हवामान शिखर परिषदेपूर्वी महत्त्वपूर्ण हवामानविषयक वचनबद्ध राहतील. बहुतेक राष्ट्रप्रमुख G-20 चर्चा संपताच ग्लासगोला रवाना होतील. बैठकीच्या पूर्वसंध्येला, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अधिक प्रदूषण करणाऱ्या राष्ट्रांच्या कमकुवत वचनबद्धतेमुळे ग्लासगो बैठक अयशस्वी झाल्याचा इशारा दिला.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी