जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार; महिला शिक्षकेसह मुख्याध्यापकाचा मृत्यू

ईदगाह परिसरातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

Jammu and Kashmir terrorists broke into a school and opened fire on teachers
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • श्रीनगरमधील ईदगाह परिसरातील शाळेत दहशतवाद्यांचा गोळीबार
  • या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
  • समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या निष्पाप लोकांना ठार केलं जात आहे.

श्रीनगर : मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दोन तासांच्या आत तीन दहशतवादी (Terror Incident) घटना घडल्या. आज पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह  (Idgah) परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ईदगाह परिसरातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

श्रीनगरमधील सफा कदल भागात गुरुवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका शाळेत घुसून मुख्याध्यापकाची आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या बंदूकधाऱ्यांनी येथील अलोचीबाग येथील रहिवासी सतींदर कौर आणि दीपक चंद या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर दोघांनाही SKIMS रुग्णालयात हलवण्यात आले. जेथे त्यांना दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी जीएनएसला दिली आहे. या घटनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान डीजीपी जम्मू-कश्मीर दिलबाग सिंह यांनी सांगितले की, समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या निष्पाप लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. दहशतवादी सीमेपलीकडून पाकिस्तानच्या सांगण्यावरून अशा कृत्य करत आहे.  

मंगळवारी तीन घटनेत तिघांची हत्या

पहिली घटना श्रीनगरमधील (Srinagar)इक्बाल पार्कजवळ घडली. ज्यात काश्मिरी पंडित समुदाय आणि बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्याचवेळी, श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ आणखी एक घटना घडली, ज्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्याला गोळ्या घातल्या. तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली ज्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी त्यांच्या नापाक योजनांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत आणि अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल.  त्याचवेळी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या दुःखाच्या परिस्थितीत मी कुटुंबासोबत आहे. ही दु: खद बातमी आहे, बिंदरू यांच्या कुटुंबासाठी माझी संवेदना. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मी या हत्येचा निषेध करते, अशा हिंसक घटनांना समाजात स्थान नाही.

जम्मू -काश्मीर संदर्भात गृह मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक

दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने आज एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. बैठकीत जम्मू -काश्मीरच्या सामान्य जनतेच्या सुरक्षेव्यतिरिक्त दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांवर चर्चा होऊ शकते. सीआरपीएफच्या डीजीसह सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारी गृह मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. याशिवाय आयबी प्रमुख आणि निमलष्करी दलांचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी