देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 535 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव ( corona) आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

last 24 hours, 39,742 new corona virus Patient registered
24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 20 हजार 551 रुग्णांचा मृत्यू
  • कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी
  • केरळ राज्यात शनिवारी 18 हजार 531 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई : देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव ( corona) आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे शनिवारी देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची (corona virus Patient ) नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची ( positive patients) संख्या 3 कोटी 13 लाख 17 हजार 901 झाली आहे. तसेच 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाने  (Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 20 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या 24 तासांत 39, 972 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 5 लाख 43 हजार 138 वर पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 8 हजार 212 वर पोहोचली आहे. 

दुसरीकडे केरळ राज्यातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडत चालली आहे. राज्यात शनिवारी 18 हजार 531 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा गेल्या 51 दिवसातील सर्वात जास्त आहे. यापूर्वी 3 जून रोजी 18 हजार 853 लोक कोरोनाबाधित आढळले होते. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास 46 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (शनिवारी) 45 लाख 74 हजार 298 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत लसीचे 43 कोटी 26 लाख 5 हजार 567 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल (शनिवारी) 6,269  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 29 हजार 817 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35टक्के आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी