Weather : येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट, राज्यावर सूर्याचा कोप कायम असणार

सध्या देशात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून (Delhi) ते उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), तामिळनाडू (Tamilnadu), केरळ(Kerala) आणि काही राज्यांत उष्णतेने थैमान घातले आहे.

In the next 24 hours, heat wave will hit this part of the country
येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट,   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट
  • विदर्भ व मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.
  • उद्यापासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता

Weather Update : नवी दिल्ली :  सध्या देशात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून (Delhi) ते उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), तामिळनाडू (Tamilnadu), केरळ(Kerala) आणि काही राज्यांत उष्णता वाढली  आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यभरातही उन्हाचा चटका अजूनही कायम आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणेही नागरिकांना कठिण होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे. 

विदर्भात सर्वाधिक तापमान

महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूर, अकोला येथे तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे, तर वर्धा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, धुळे, परभणी येथे तापमान 42 अंशांच्या पुढेच आहे. महाराष्ट्रातील आता उष्णतेची लाट ओसरली असली तरी उन्हाचा चटका कायम राहिल, असे केंद्रीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात राज्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, एप्रिल महिन्यात कडक उन्हाचा अंदाज वर्तवला जात आहे. IMD ने तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 19 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे राजधानीत सुद्दा उन्हाच्या चांगल्याच झळा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे.

बिहारमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बिहारमध्ये, पूर्व आणि आग्नेय हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 0.9 किमी पर्यंत जात आहे. केवळ राज्याच्या नैऋत्य भागात, पश्चिमेकडील आणि उत्तर-पश्चिम हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 1.5 किमी पर्यंत राहतो. हवामानातील बदलांमुळे बिहारच्या उत्तर-पूर्व भागात काही ठिकाणी पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ आकाशासह हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या ढगाळ वातावरणाचा अंदाज

दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा 42.2 कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. ४) विदर्भात तर उद्यापासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी