Plastic Pollution: येत्या काही दिवसात समुद्रात जाळं टाकल्यानंतर माशांऐवजी हाताला लागणार फक्त प्लास्टिक

आजच्या काळात संपूर्ण जग आधुनिकतेच्या प्रभावाखाली जात आहे. तसेच आपल्या जीवनात प्लास्टिक वापर वाढू लागला आहे, जगभरात प्लॅस्टिकचा झपाट्याने वाढत असलेला वापर एक दिवस पृथ्वीवर आढळणाऱ्या काही प्रजाती नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतो. प्लास्टिकमुळे दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा निर्माण होत आहे. 

plastic will be in hand instead of fish in sea
2050पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिकच लागेल गळाला  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • समुद्रातील प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दरवर्षी समुद्रात आढळणाऱ्या जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
  • दरवर्षी 10 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा समुद्रात सोडला जातो.
  • 27 जून 2022 ते 1 जुलै 2022 या कालावधीत केनिया आणि पोर्तुगालच्या सरकारांनी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केली

Plastic Pollution in Ocean: आजच्या काळात संपूर्ण जग आधुनिकतेच्या प्रभावाखाली जात आहे. तसेच आपल्या जीवनात प्लास्टिक वापर वाढू लागला आहे, जगभरात प्लॅस्टिकचा झपाट्याने वाढत असलेला वापर एक दिवस पृथ्वीवर आढळणाऱ्या काही प्रजाती नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतो. प्लास्टिकमुळे दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा निर्माण होत आहे. 

अशा स्थितीत संयुक्त राष्ट्राने प्लास्टिकबाबत चिंता व्यक्त केली आहे. 2050 पर्यंत समुद्रात माशांऐवजी प्लास्टिक जास्त असतील, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. खरे तर जगभरात जो प्लास्टिक कचरा बाहेर पडतो, त्याचा पूर्णपणे पुनर्वापर होत नाही. अशा स्थितीत बहुतांश ठिकाणी प्लास्टिकचा कचरा समुद्रात टाकला जात असल्याने महासागरातील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे.

Read Also : सोशल मीडियाद्वारे दहशतावाद्यांची भरती अन् मिळवला जातोय निधी

समुद्रातील प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दरवर्षी समुद्रात आढळणाऱ्या जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळेच 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल, असा इशारा देत संयुक्त राष्ट्रांनी प्लास्टिकचा वापर आणि समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा इशारा दिला आहे.

यासाठी 27 जून 2022 ते 1 जुलै 2022 या कालावधीत केनिया आणि पोर्तुगालच्या सरकारांनी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये समुद्रातील वाढते प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला होता. या वर्षी युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्र यांच्या सहकार्यातून संयुक्त राष्ट्र महासागर परिषद सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Also : कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा विक्रम

जगभरात दरवर्षी 300 दशलक्ष टनांपेक्षा जास्त प्लास्टिक तयार होते. ज्यामध्ये दरवर्षी 10 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा समुद्रात सोडला जातो.  त्यामुळे समुद्री जीव हे मायक्रोप्लास्टिक्स त्यांचे अन्न म्हणून खातात. त्यामुळे दरवर्षी 100 दशलक्ष समुद्री जीव मरत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी