Lover Kidnapped Brother Of Groom : नवी दिल्ली : मानवी नाती आणि माणसाचे स्वभाव हे अनेकदा कळण्यापलीकडे असतात. यातूनच अनेकदा गुन्हे (Crime)घडत असतात. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ललितपूर जिल्ह्यातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे एक वेगळीच प्रेमकथा समोर आली आहे. या घटनेत प्रेयसीच्या लग्नाचा राग आल्याने एका प्रियकराने आधी प्रेयसीच्या भावाचे अपहरण केले आणि नंतर मेव्हण्याला परत करण्याऐवजी प्रेयसीला खंडणी म्हणून परत करण्याची मागणी केली. हा विचित्र गुन्हा आणि प्रेमकथा त्यानंतर जे घडले त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) झाला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे याबद्दल जाणून घेऊया. (In Uttar Pradesh lover kidnapped groom's brother to get back his girlfriend)
अधिक वाचा : Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
ही घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील आहे. ललितपूर जिल्ह्यातील बार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केल्यावर हा संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी पहिला प्रियकर गोलूचे त्याच्या प्रेयसीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. हा सर्व प्रकार एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात सुरू झाला. तिथून मग हे दोघेही फोनवर बोलू लागले.
अधिक वाचा : भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक
प्रेमकथा सुरू असतानाच असे काही घडले की मुलीला राग आला आणि तिने मुलाचा मामे भाऊ उमेश याच्याशी फोनवर बोलण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याच्यासोबत मुलीचे त्याच्याबरोबर प्रेमप्रकरण सुरू झाले. मग घरातील लोक लग्नासाठी तयार झाले. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे लग्नही झाले होते. यानंतर मात्र या सर्व प्रकाराचा गोलूला राग आला आणि त्याने आपल्या प्रेयसीला परत मिळवण्याचे ठरवले. यासाठी त्याने वराच्या लहान भावाचे म्हणजेच त्याची मामे भावाचे शालूचे अपहरण केले. अपहरणाच्या बदल्यात त्याने प्रेयसीला परत देण्याची मागणी केली.
अधिक वाचा : Astrology 2022 : गुरुवारची अशी पूजा केल्यास मिळेल लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद...मिळेल धनसंपत्ती, अशी करा पूजा
हा सर्व प्रकार झाल्यानंतर दोन्ही कुटुंबात आणि परिसरात एकच खळबळ उडाली. 7 नोव्हेंबर रोजी उमेश कुटुंबासह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेला. तिथे त्याने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूच्या दोन साथीदारांना अटक केली. शिवाय त्यांच्या तावडीतून शालूला सुखरूप बाहेर काढले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली. अखेर मुख्य आरोपी असलेल्या आणि प्रेमी गोलूने आत्मसमर्पण केले. सर्वानाच धक्का देणाऱ्या या विचित्र प्रेमकथेचा आणि प्रकरणाचा सध्या पोलिस तपास करत आहेत.
प्रियकर आणि प्रेयसीच्या या धक्कादायक प्रकरणात दोन्ही घरांची मात्र फरफरट झाली आहे. हे एकंदर प्रकरण पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मानवी नातेसंबंध कोणत्या थराला जाऊ शकतात आणि कोणती पातळी गाठू शकतात याचे हे प्रकरण म्हणजे एक उदाहरण आहे.