Uttarakhand Bus crashed into a ravine : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू

उत्तराखंडमध्ये बसला भीषण (Uttarakhand bus accident) अपघात झाला आहे. देहरादून (Dehradun) येथील विकासनगर (Vikasnagar ) परिसरातील बुल्हाड बायला (Bulhad Bayla) रोडवरील दरीत बस कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Uttarakhand Bus crashed into a ravine
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात झाला
  • बस लहान होती आणि त्यातून 25 प्रवासी प्रवास करत होते.
  • मृत झालेले सर्व 13 जण हे एकाच गावातील निवासी होते.

Uttarakhand Bus crashed into a ravine : देहरादून :  उत्तराखंडमध्ये बसला भीषण (Uttarakhand bus accident) अपघात झाला आहे. देहरादून (Dehradun) येथील विकासनगर (Vikasnagar ) परिसरातील बुल्हाड बायला (Bulhad Bayla) रोडवरील दरीत बस कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतरही काही जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुल्हाड बायला रोडवरुन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस, एसडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. अपघाताची सर्वप्रथम माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात झाला आहे. बस लहान होती आणि त्यातून 25 प्रवासी प्रवास करत होते. ज्या मार्गावरुन बस धावत होती त्या मार्गावर जास्त गाड्या धावत नसल्याने बसमध्ये क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातात मृत झालेले सर्व 13 जण हे एकाच गावातील निवासी होते. हे नागरिक कुठल्या गावातील निवासी होते तसेच ते कुठे चालले होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

बस अपघातात मृत पावणाऱ्यांची नावे

मातबर सिंह सगराईक, त्यांच पत्नी आणि एक वर्षाची मुलगी, जयपाल सिंह देवबाइक, त्यांचा लहान भाऊ नरिया त्यांची छोटी बहिण, साधराम चबाईक मनाईक, ईशा, (गजेंद्र सिंह यांची मुलगी),रतन सिंह दलाण, मसराणचे दान सिंह, खणकायकचे पंडित हरिराम यांचा मृत्यु झाला आहे. जगत बाजगी बायला यांची मुलगी काजल, एक अन्य बाजगी मलेथा यांचा मृ्त्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी