Corona Alert Mask Alert : कोणकोणत्या राज्यांमध्ये कोरोनामुळे मास्कसक्ती लागू?

in which states mask is compulsory : भारतातील निवडक राज्यांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागताच पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू झाली आहे. ही सक्ती संबंधित राज्यांपुरतीच मर्यादीत आहे. मास्कसक्तीचे पालन केले नाही तर दंड लागू करण्याची व्यवस्था संबंधित राज्यांमध्ये सुरू झाली आहे.

in which states mask is compulsory
Corona Alert Mask Alert : कोणकोणत्या राज्यांमध्ये कोरोनामुळे मास्कसक्ती लागू?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोणकोणत्या राज्यांमध्ये कोरोनामुळे मास्कसक्ती लागू?
  • भारतातील निवडक राज्यांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागताच पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू
  • दिल्ली आणि चंदिगडमध्ये मास्क घातला नाही तर ५०० रुपयांचा दंड

in which states mask is compulsory : नवी दिल्ली : भारतातील निवडक राज्यांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागताच पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू झाली आहे. ही सक्ती संबंधित राज्यांपुरतीच मर्यादीत आहे. मास्कसक्तीचे पालन केले नाही तर दंड लागू करण्याची व्यवस्था संबंधित राज्यांमध्ये सुरू झाली आहे.

  1. दिल्ली : दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशात वाढत्या कोरोना संकटामुळे २२ एप्रिल २०२२ पासून मास्कसक्ती लागू. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे बंधन. मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरल्यास ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
  2. उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये १८ एप्रिल २०२२ पासून वाढत्या कोरोना संकटामुळे मास्कसक्ती लागू. लखनऊ, गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापुड, मेरठ, बुलंदशहर, बागपत या सहा एनसीआर जिल्ह्यांमध्ये मास्कसक्ती लागू.
  3. केरळ : वाढत्या कोरोना संकटामुळे मास्कसक्ती लागू. मास्कसक्तीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार. 
  4. कर्नाटक : कर्नाटकमध्ये वाढत्या कोरोना संकटामुळे २५ एप्रिल २०२२ पासून मास्कसक्ती. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी. शासकीय जनजागृती मोहीम सुरू
  5. पंजाब : पंजाबमध्ये २१ एप्रिल २०२२ पासून वाढत्या कोरोना संकटामुळे मास्कसक्ती लागू. 
  6. तेलंगणा : मास्कसक्ती हटविल्यानंतर महिन्याभरात पुन्हा मास्कची सक्ती लागू. राज्यात २१ एप्रिल २०२२ पासून मास्कसक्ती लागू.
  7. चंदिगड : चंदिगड या केंद्रशासीत प्रदेशात २५ एप्रिल २०२२ पासून मास्कसक्ती लागू. मास्क घातले नाही तर ५०० रुपयांच्या दंडाची तरतूद.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी