IT Department Raid in MP: दारू व्यवासायिकाकडे कुबेराचा खजिना; पाण्याच्या टाकीतून मिळाल्या 500 अन् 2000 हजाराच्या नोटा

IT Department Raid in MP :मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधल्या दामोह इथं आयकर विभागाने  (Income Tax Department) एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या जमवलेले करोडो रुपये आणि दागिने जप्त केले आहेत.

Income Tax Department Raid in MP
पाण्याच्या टाकीतून मिळाल्या 500 अन् 2000 हजाराच्या नोटा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दमोहमधील मद्यविक्रेते शंकर राय आणि त्याच्या भावांच्या घरावर इन्कम टॅक्सने छापा टाकला.
  • आयकर विभागाने राय कुटुंबाकडून सुमारे 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे
  • दारू व्यावसायिक आणि त्याच्या भावांकडून साडेआठ कोटी रुपये रोख, साडेपाच कोटी रुपयांचे हिरे आणि रत्ने सापडली आहेत. सुमारे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

Income Tax Department Raid on Bartender : दमोह:  मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधल्या दामोह इथं आयकर विभागाने  (Income Tax Department) एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या जमवलेले करोडो रुपये आणि दागिने जप्त केले आहेत. दमोहमधील मद्यविक्रेते  (Liquor sellers)शंकर राय आणि त्याच्या भावांच्या घरावर इन्कम टॅक्सने टाकलेल्या छाप्यात (Raid) करोडो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या हाती तब्बल 8 कोटी रुपये आणि 3 किलो सोनं लागले आहे. विशेष म्हणजे नोटा भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत (Cash in Water Tank) एका पिशवीत लपवून ठेवल्या होत्या. यासंदर्भात सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

एका व्हिडिओमध्ये अधिकारी पाण्याच्या टाकीतून नोटांनी भरलेल्या पिशव्या काढत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, आयकर अधिकारी पाण्यातून काढलेल्या नोटा जमिनीवर ठेवत आहेत आणि नोटा सुकवण्यासाठी हेअर ड्रायर आणि कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्रेसचा वापर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने राय कुटुंबाकडून सुमारे 8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. राय कुटुंबीयांना या छाप्याची माहिती होती. त्यामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांपासून वाचता यावे यासाठी त्यांनी पिशव्यांमध्ये नोटा भरल्यानंतर त्या पाण्याच्या टाकीत सोडल्या होत्या. आयकर अधिकाऱ्यांनी त्याचा माग काढला. त्या पिशव्या बाहेर काढल्या. नोटा सुकवून नंतर बँकांमधून आणलेल्या नोट मोजणी यंत्राने मोजण्यात आल्या. पाण्याच्या टाकीतून सुमारे एक कोटी रुपये काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही रक्कम 2000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांमध्ये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Meme wala (@memewalanews)

8 कोटींची रोकड, हिरे आणि दागिने, 16 वाहने सापडली

आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मुनमुन शर्मा यांनी एक दिवसापूर्वी जबलपूरमध्ये सांगितले होते की, या कारवाईत दारू व्यावसायिक आणि त्याच्या भावांकडून साडेआठ कोटी रुपये रोख, साडेपाच कोटी रुपयांचे हिरे आणि रत्ने सापडली आहेत.  सुमारे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. विभागाने 16 वाहनेही जप्त केली आहेत. आयकर विभागाने गुरुवारी आणि शुक्रवारी काँग्रेसचे राजा राय, शंकर राय आणि भाजपचे कमल राय यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर छापे टाकले. आयकर विभागाच्या पथकाने राय कुटुंबाच्या सर्व ठिकाणांची तपासणी केली. राय कुटुंबाची स्थावर मालमत्ता इतरांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या नावावर असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी