मोठी बातमीः रेल्वे मंत्रालयाकडून लॉकडाऊनमध्ये वाढ, रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. आजपासून 21 दिवस देशात लॉकडाऊन असणार आहे.

Indian Railway
रेल्वे मंत्रालयाकडून लॉकडाऊनमध्ये वाढ, रेल्वेचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. आजपासून 21 दिवस देशात लॉकडाऊन असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासनानंही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

या लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वेच्या सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेल आणि मालवाहतूक गाड्या रद्द राहणार आहेत.  यापूर्वी रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता देशात दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान येत्या 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या रद्द केल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. यात उपनगरातील रेल्वेचाही समावेश होता. 

याच दरम्यान भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत ज्या लोकांनी तिकीटं बूक केली आहे. त्या सर्वांचे पैसे  परत देण्याचे आदेश देण्यात आले आहे.  ज्या प्रवाशांनी ऑनलाइन रेल्वेची तिकीटं बूक केली आहे. अशा सर्व प्रवाशांचे पैसे हे परत दिले जाणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता भारतीय रेल्वेनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

भारतीय रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे रेल्वे सेवा रद्द करावी लागली आहे. मात्र लोकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा सुरूच राहणार आहे. त्यासाठी मालगाडी सेवा सुरूच राहणार आहे.  23 मार्चला धान्य, मीठ, खाद्य तेल, साखर, दूध,फळं आणि भाजीपाला, कोळसा आणि  पेट्रोलियम उत्पादानाचे  474 रॅक तयार केले आहे.


आंतरराज्यीय विमानसेवाही बंद

 आता राज्यांतर्गत विमानसेवा सुद्धा सरकारनं थांबवली आहे. यापूर्वी केंद्र सरकारनं रेल्वे सेवा थांबवलेल्या आहेत. राज्यांतर्गंत विमानसेवा रद्द करण्याचा हा निर्णय 24 मार्चपासून लागू  करण्यात आला आहे. देशात दररोज जवळपास सात हजार फ्लाईट्स उडतात, यातून लाखोंच्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असतात. सरकारनं या निर्णयातून कॉर्गो सेवांना बाहेर ठेवलंय.

अनेक देशांनी उचलले असे पाऊल

जगातील १७० हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसनं आपलं पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विमानसेवा रद्द केल्या आहेत. सोमवारी संयुक्त अरब अमिरातनं घोषणा केली की, ते कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपल्या सर्व प्रवासी विमान सेवा दोन आठवड्यांसाठी बंद करत आहेत. यात तिथून दुसऱ्या देशांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी