Monkeypox: मंकीपॉक्सचा धोका वाढला; व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव

कोरोनानंतर (Corona) देशात मंकीपॉक्स (Monkeypox) व्हायरसचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढू लागली आहे. या विषाणूच्या संसर्गाने (infection) मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी आता नवीन माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा (virus) पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव झाला आहे.

Transmission of monkey pox from man to dog
माणसाकडून कुत्र्याला मंकीपॉक्सचा संसर्ग   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आफ्रिकन देशांमध्येही हा विषाणू फक्त जंगली उंदीर, गिलहरी आणि माकडे या प्राण्यांमध्ये आढळून आला आहे.
  • कोरोना विषाणूबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे वाढत आहेत.
  • मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव झाला आहे.

मुंबई : Monkeypox Study: कोरोनानंतर (Corona) देशात मंकीपॉक्स (Monkeypox) व्हायरसचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढू लागली आहे. या विषाणूच्या संसर्गाने (infection) मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी आता नवीन माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा (virus) पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव झाला आहे. जगात अशी पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 

लॅन्सेट जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील दोन पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 12 दिवसांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा नमुनाही घेण्यात आला. कुत्र्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि त्यातही मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. कोरोना विषाणूबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे तेथील सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. आता WHOही याबाबत सक्रिय झाले आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Read Also : रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भावानं केला प्रताप

ते म्हणजे या लॅन्सेट जर्नलच्या अहवालानुसार, हा विषाणू मानवाकडून प्राण्यांमध्येही पसरू शकतो. मंकीपॉक्सचा हा प्रकार मानवाकडून प्राण्यांमध्ये पसरल्याने तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. 94 देशांमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सचे 37,369 रुग्ण आढळले आहेत.

रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित  

लॅन्सेट जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. पॅरिस, फ्रान्समधील सोरबोन विद्यापीठातील संशोधकांनी मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या दोन पुरुषांचा अभ्यास केला. त्यांचा मंकीपॉक्स रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुमारे दीड आठवड्यानंतर त्याच्या 4 वर्षांच्या कुत्र्याचीही मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. त्यानंतर कुत्र्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

Read Also : घरामध्ये सौभाग्य हवं असेल तर नक्की करा हे 5 उपाय

कुत्र्यांमध्ये देखील मानवासारखी लक्षणे  

ज्यांनी त्यांचा अभ्यास केला त्यांना हे पाहून आणखीच आश्चर्य वाटले की कुत्र्याच्या शरीरावर मंकीपॉक्सची लक्षणे अगदी माणसांसारखीच होती. कुत्र्याच्या पोटाच्या खालच्या भागातही दाणे (पुळ्या) होते. याशिवाय त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पू भरलेले लाल फोड दिसून आले. 

पाळीव प्राण्यांमध्ये प्रथमच पुष्टीकरण

तज्ज्ञांच्या पथकाने कुत्रे आणि त्यांच्या मालकांचे अहवाल तपासले तेव्हा असे आढळून आले की, विषाणूच्या डीएनएचा वंश B.1 आहे. ते एप्रिलपासून युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत पाळीव प्राण्यामध्ये संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. आफ्रिकन देशांमध्येही हा विषाणू फक्त जंगली उंदीर, गिलहरी आणि माकडे या प्राण्यांमध्ये आढळून आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी