Independence Day 2022: भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन आज (सोमवार १५ ऑगस्ट २०२२) साजरा होत आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने 'हर घर तिरंगा' मोहीम यशस्वीरित्या राबविली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहाने साजरे होत आहे. या आनंदाच्या प्रसंगी जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकला. 'स्पेस किड्ज इंडिया'ने जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकवला.
जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकवण्यासाठी 'स्पेस किड्ज इंडिया'ने स्वातंत्र्यदिनी एका विशिष्ट प्रकारच्या फुग्याचा वापर करून भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा जमिनीपासून १ लाख ६ हजार फूट उंचीवर पाठवला. यानंतर जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकला. या घटनेचा व्हिडीओ 'स्पेस किड्ज इंडिया'ने त्यांच्या अधिकृत यूट्युब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'स्पेस किड्ज इंडिया' ही संस्था देशातील तरुण बुद्धिमान वैज्ञानिकांसाठी काम करते. युवा संशोधकांच्या कार्याला प्रसिद्धी मिळावी तसेच नवे संशोधक घडवावे यासाठी 'स्पेस किड्ज इंडिया' मोठे काम करत आहे.