Independence Day 2022 Speech, Flag Hoisting: लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी करणार ध्वजारोहण, किती वाजता होणार भाषण, कुठे आणि कसे बघाल Live?

Independence Day 2022 Flag Hoisting, PM Modi Speech Time, Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर सलग नवव्यांदा ध्वजारोहण करतील. यानंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतील. 

Independence Day 2022 Flag Hoisting, PM Modi Speech Time, Live Streaming
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी करणार ध्वजारोहण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी करणार ध्वजारोहण
  • किती वाजता होणार भाषण?
  • कुठे आणि कसे बघाल Live

Independence Day 2022 Flag Hoisting, PM Modi Speech Time, Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर सलग नवव्यांदा ध्वजारोहण करतील. यानंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतील. 

PM Kisan : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 31 ऑगस्टपर्यंत करता येईल e-KYC

भारत स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त हा उत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ७५ आठवडे हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सलग तीन दिवस 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) फडकविण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी तिरंगा फडकत असल्याचे चित्र आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण केल्यानंतर परंपरेनुसार देशाला उद्देशून भाषण करतील. प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरून केलेले पंतप्रधान मोदींचे भाषण विशेष ठरले आहे. पंतप्रधान प्रत्येकवेळी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून देशापुढे किमान एक नवा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमात देशातील नागरिक उत्साहाने आणि प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी होतात. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यामुळे पंतप्रधान यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशासमोर कोणत्या नव्या कार्यक्रमाची घोषणा करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेले भाषण दूरदर्शनवर लाइव्ह बघता येईल. दूरदर्शनच्या यू ट्युब चॅनलवर पण भाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. 

पंतप्रधान लाल किल्ल्यावरून जे भाषण करतात त्यात सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा थोडक्यात आढावा घेतात. पुढील काळात केंद्र सरकार काय करणार आहे याबात थोडक्यात सूतोवाच करतात. 

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार १४ ऑगस्ट २०२२ रोजी 'विभाजन भयावह स्मरण दिवस'च्या निमित्ताने फाळणीच्या वेळी प्राण गमाविणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मागच्या वर्षीपासून पंतप्रधानांनी देशात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी झाली म्हणून 'विभाजन भयावह स्मरण दिवस' अशा स्वरुपात आठवणी जागवण्याचा दिवस असेल असे जाहीर केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी कोणते कपडे परिधान करून येणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे. दरवर्षी पंतप्रधान वेगवेगळे परंपरागत वेष परिधान करून लाल किल्ल्यावर येतात. या निमित्ताने देशात नव्या फॅशनची सुरुवात होते. मोठ्या संख्येने तरुण पिढी तशा पद्धतीचे कपडे खरेदी करून परिधान करणे पसंत करते. यामुळेच यंदा पंतप्रधान कोणता परंपरागत वेष परिधान करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी