India administered more than 165 crore vaccine doses : नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रतिबंधक लसचे १६५ कोटी ४ लाखांपेक्षा जास्त डोस टोचण्यात आले. देशात २० लाख ४ हजार ३३३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशाचा कोरोना अॅक्टिव्ह रेट ४.९१ टक्के तर रिकव्हरी रेट ९३.८९ टक्के आहे. मागील २४ तासांमध्ये भारतात २ लाख ३५ हजार ५३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत देशातील ३ लाख ३५ हजार ९३९ कोरोना रुग्ण बरे झाले. देशाचा दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १३.३९ टक्के तर साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.८९ टक्के आहे. आतापर्यंत देशात ७२ कोटी ५७ लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मागील २४ तासांमध्ये देशात १७ लाख ५९ हजार ४३४ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
महाराष्ट्रात २ लाख ६६ हजार ५८६ कोरोना आणि १४३७ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २४ हजार ९४८ नव्या कोरोना रुग्णांची आणि १०३ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ४५ हजार ६४८ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ३०४० ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६०३ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८५८ कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७६ लाख ५५ हजार ५५४ कोरोना रुग्णांपैकी ७२ लाख ४२ हजार ६४९ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ४६१ मृत्यू झाले तसेच ३८५८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे १४ लाख ६१ हजार ३७० होम क्वारंटाइन तर ३२०० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८६ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३२ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.६१ टक्के आहे.
(ट्वीट अपडेट केलेल्या आज सकाळच्या अंतिम आकडेवारीचे आहे.)