भारतीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अमेरिकेच्या मीडियाची 'बोलती बंद'

india again shows mirror to us media on buying oil from russia : भारतीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अमेरिकेच्या मीडियाची 'बोलती बंद' झाली. ही घटना अमेरिकेत घडली. 

india again shows mirror to us media on buying oil from russia
भारतीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अमेरिकेच्या मीडियाची 'बोलती बंद'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अमेरिकेच्या मीडियाची 'बोलती बंद'
  • अमेरिकेत घडली घटना
  • भारत रशिया तेल व्यवहार या विषयावर मंत्र्याने केले वक्तव्य

india again shows mirror to us media on buying oil from russia : भारतीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अमेरिकेच्या मीडियाची 'बोलती बंद' झाली. ही घटना अमेरिकेत घडली. 

भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. या व्यवहारात भारताकडून मोजले जात असलेले पैसे रशिया युक्रेन विरुद्धच्या लढाईत वापरत आहेत. भारताचा हा व्यवहार अप्रत्यक्षपणे रशियाला लढाईसाठी आर्थिक पाठबळ पुरवत आहे, अशा स्वरुपाचा आरोप करत अमेरिकेतील सीएनएन या वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नाला पुरी यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. या उत्तराने सीएनएन या वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीची 'बोलती बंद' झाली.

भारत रशियाकडून एकूण तेलाच्या गरजेपैकी फक्त 0.2 टक्के तेल खरेदी करतो. भारताकडे सध्या इराकमधून मोठ्या प्रमाणावर तेल येते, असे पुरी यांनी सांगितले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाईची सुरुवात फेब्रुवारी 2022 मध्ये झाली. यानंतर अमेरिका आणि युरोपच्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यातले अनेक निर्बंध आजही कायम आहेत. 

पुण्याच्या रुपी बॅंकेला दणका! बॅंकेचे लायसन्स रद्दच राहणार, अर्थमंत्रालयाचा निर्णय

तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, मोहात पडून करू नका हे काम

विशेष म्हणजे निर्बंध असूनही युरोपचे देश दररोज दुपार पर्यंत रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतात त्याच्या एक तृतियांश तेल भारत खरेदी करतो, अशी माहिती हरदीप सिंह पुरी यांनी दिली. मागील महिन्यातही भारताने रशियाकडून नाही तर इराककडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केल्याचे पुरी म्हणाले. 

भारत कोणत्याही देशाच्या दबावाला बळी पडून स्वतःचे तेलाशी संबंधित व्यापाराचे निर्णय घेत नाही. देशाचे तेलाच्या व्यवहाराशी संबंधित निर्णय हे गरजांचा विचार करूनच घेतले जातात, अशी माहिती पुरी यांनी दिली. देशातील तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचेही ते म्हणाले. 

याआधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भारत रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतो त्यापेक्षा कैक पट जास्त खरेदी युरोपचे देश दुपारपर्यंत करतात, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. अमेरिका निर्बंध लादते आणि रशियाकडूनच 10 टक्के तेल खरेदी करते, असेही जयशंकर म्हणाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी