India role model for religious harmony : भारत सर्वधर्मसमभावाचा आदर्श - दलाई लामा

India an example and role model for religious harmony says Dalai Lama भारत हा देश सर्वधर्मसमभावाचा आदर्श आहे, असे तिबेटच्या नागरिकांचे अध्यात्मिक नेते दलाई लामा म्हणाले. ते श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे थेरवाद संघाच्या 'महा सतीपत्तन सुत्त' या कार्यक्रमात बोलत होते.

India an example and role model for religious harmony says Dalai Lama
भारत सर्वधर्मसमभावाचा आदर्श - दलाई लामा 
थोडं पण कामाचं
  • भारत सर्वधर्मसमभावाचा आदर्श - दलाई लामा
  • श्रीलंकेतील कार्यक्रमात दलाई लामांनी केले वक्तव्य
  • भारतीय संस्कृतीचे दलाई लामांनी केले कौतुक

India an example and role model for religious harmony says Dalai Lama : नवी दिल्ली : भारत हा देश सर्वधर्मसमभावाचा आदर्श आहे, असे तिबेटच्या नागरिकांचे अध्यात्मिक नेते दलाई लामा म्हणाले. ते श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे थेरवाद संघाच्या 'महा सतीपत्तन सुत्त' या कार्यक्रमात बोलत होते. दलाई लामा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

एक शरणार्थी म्हणून भारतात आलो त्यावेळी भारतात अहिंसा आणि धार्मिक सद्भाव, सर्वधर्मसमभाव बघितला. भारतात असलेल्या या बाबी अतिशय उत्कृष्ट अशा आहेत; असे दलाई लामा म्हणाले.

श्रीलंकेतील कार्यक्रमाचे आयोजन श्रीलंका तिबेट बौद्ध ब्रदरहूड सोसायटी या संस्थेने केले होते. श्रीलंका आणि तिबेटमधील बौद्ध संस्कृतीची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

कोलंबोतील कार्यक्रमात बोलताना दलाई लामा यांनी भारतीय धार्मिक परंपरांचे जाहीर कौतुक केले. भारतीयांच्या अहिंसेच्या विचारांचेही दलाई लामा यांनी कौतुक केले. अहिंसा आणि करुणा यांचा अभ्यास तीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे; असे दलाई लामा म्हणाले. 

भारतात जगभरातील वेगवेगळ्या धर्मांचे नागरिक एकत्र वास्तव्य करतात. या देशात हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू या धर्माचे नागरिक राहतात. धार्मिक विविधता असली तरी देश म्हणून भारत आजही एकसंध आहे.  या देशात धार्मिक सद्भावाला महत्त्व आहे. 

चिनी आक्रमणानंतर तिबेटमधील नागरिकांनी आश्रयासाठी भारतात प्रवेश केला, त्यावेळी निर्वासितांमध्ये दलाई लामा पण होते. त्यांनी भारतात प्रवेश केल्यानंतर सलग अनेक वर्ष देशातील अहिंसक विचार आणि सर्वधर्मसमभाव बघितला. याआधारे बोलताना दलाई लामा यांनी भारतीय संस्कृतीचे श्रीलंकेतील कार्यक्रमात विशेष कौतुक केले.

बुद्धाने स्वतःचे परिक्षण स्वतः करा, पुस्तकी ज्ञान घेतले तरी आत्मपरीक्षण करा,  सतत आधुनिक ज्ञान मिळवा; अशा स्वरुपाचे मार्गदर्शन केले. भारतातल्या नालंदा विद्यापीठात तर अभ्यासक्रमांचे सातत्याने परीक्षण करुन विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देण्यावर भर होता. यामुळेच बुद्ध विचारांवर सतत चिंतन होणे आवश्यक आहे. सततच्या चिंतनातून माणूस अधिकाधिक बुद्धमय होतो. एकदा शिकलो म्हणजे संपले असे नसते हे लक्षात ठेवा; असेही दलाई लामा म्हणाले. त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सतत विद्यार्थीदशेत राहून अधिकाधिक ज्ञानाचे ग्रहण करण्याचा सल्ला दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी