भारत ३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करणार अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन?

India and US $3 billion Predator drone deal in advanced stage : भारत लवकरच अमेरिकेकडून ३० प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) खरेदी करणार आहे. यासाठी भारत अमेरिकेसोबत सुमारे ३ अब्ज अमेरिकन डॉलरचा करार करणार आहे.

India and US $3 billion Predator drone deal in advanced stage
भारत ३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करणार अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत ३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करणार अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन?
  • भारत लवकरच अमेरिकेकडून ३० प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) खरेदी करणार
  • कराराची बोलणी महत्त्वाच्या टप्प्यावर

India and US $3 billion Predator drone deal in advanced stage : भारत लवकरच अमेरिकेकडून ३० प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) खरेदी करणार आहे. यासाठी भारत अमेरिकेसोबत सुमारे ३ अब्ज अमेरिकन डॉलरचा करार करणार आहे. कराराची बोलणी महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करून विशिष्ट लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रीडेटर ड्रोन मोठ्या प्रमाणात वापरते. यामुळे हे ड्रोन अतिशय प्रभावी म्हणून ओळखले जातात.

संसद निवासाच्या छतावरून पडून तरुणीचा मृत्यू, CCTV फुटेजमधून निर्माण झाले अनेक प्रश्न

सुधारित प्रीडेटर ड्रोन एकदा इंधन भरून घेऊन ताशी २१७ किमी. वेगाने १२०० किमी. पर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहेत. संगणकीय यंत्रणेच्या मदतीने लक्ष्य निश्चित करून त्याचा पाठलाग करणे आणि त्यावर हल्ला करून ते नष्ट करणे हे या ड्रोनचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संरक्षण दलाचे तिन्ही विभाग (भूदल, नौदल आणि हवाई दल) प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्यास उत्सुक आहेत. भारत प्रामुख्याने चीनसोबतच्या सीमेवर आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control - LAC) तसेच समुद्रात निवडक भागांमध्ये प्रीडेटर ड्रोन कार्यरत ठेवणार असल्याचे वृत्त आहे. 

यानम : भारताच्या मंगळ मोहिमेवरील पहिली संस्कृत डॉक्युमेंट्री

प्रीडेटर ड्रोनमुळे चीनच्या बेलगाम आक्रमक हवाई हालचाली थंडावतील असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी केल्यास सैन्याची ताकद वाढेल आणि सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच या हालचालींना पायबंद घालण्यासाठी कारवाई करणे भारताला सोपे होणार आहे, असेही मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जनरल ऑटोमिक्स भारताला आधुनिक प्रीडेटर ड्रोनचा (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) पुरवठा करणार आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) संदर्भातील चर्चा एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच पुढील निर्णय होणार आहेत. 

एप्रिल २०२२ भारताचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेवेळी प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) बाबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर बातचीत झाली. यानंतर प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) कराराशी संबंधित चर्चा प्रगतीपथावर आहे. 

याआधी भारताच्या नौदलाने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) भाडेतत्वावर घेतले होते. भारताने २०२० मध्ये प्रीडेटर ड्रोन भाडेतत्वावर घेण्यासाठी करार केला होता. नंतर या कराराला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ भारत प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्यास उत्सुक असल्याचा पहिला संकेत होती. आता तर भारत आणि अमेरिका प्रीडेटर ड्रोन (एम क्यू ९ बी किंवा प्रीडेटर बी किंवा एम क्यू ९ रीपर) महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करत आहेत. लवकरच संरक्षण क्षेत्रातील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा होण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी