पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त

पाकिस्तानने जूम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या या कृत्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र, या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद

ceasefire violation by Pakistan
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार
  • पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर
  • गोळीबारात भारताचा एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर: पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ सकाळी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने सकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या आसपास गोळीबार आणि मोटार्सच्या सहाय्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानकडून होत असलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. या दरम्यान एक भारतीय जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना त्याला भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत होतं आणि याच दरम्यान भारतीय जवान लान्स नायक संदीप थापा यांना गोळी लागली. गंभीर जखमी झालेले ३५ वर्षीय संदीप थापा हे या गोळीबारात शहीद झाले. संदीप थापा हे देहरादून येथील निवासी होते. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या मते, 'पाकिस्तानने एलओसी जवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौक्यांवर आणि गावांवर गोळीबार, तोफांचा मारा करण्यास सुरूवात केली. हा गोळीबार अद्यापही सुरू असल्याची माहिती आहे'.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी आणि उरी येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि यामध्ये चार पाकिस्तानी सैन्यांना मारण्यात आलं होतं.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भारतीय सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरल्याचं पहायला मिळत आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारने भारतासोबतचे व्यापार संबंध तोडले, ट्रेन सेवा बंद केली, बस सेवा रद्द केली. यासोबतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुतांश देशांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान सरकारला समर्थन देण्यास नकार दिला. 

यानंतर पाकिस्तानने आपला मित्र असलेल्या चीनकडे मदत मागितली. चीनने काश्मीर मुद्द्यावर यूएनएससीमध्ये बंद खोलीच चर्चा करण्याची मागणी केली. चीनच्या मागणीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी भारताने आपली बाजू ठामपणे मांडली आणि हा प्रश्न आमचा अंतर्गत असल्याचं ठणकावून सांगितलं.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचं विभाजन करतानाच दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश बनवण्याची घोषणा केली होती. यानंतर पाकिस्तान बिथरला आणि थटथयाट सुरू केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा भारताला युद्धाची धमकी दिल्याचं समोर आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...