Sadhvi Pragya news : भारताच्या सनातन परंपरेला कायम ठेवू, म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर

India belongs to Hindus & Sanatana will stay here:BJP's Sadhvi Pragya in Bhopal : पैगंबराविषयीच्या नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. मुस्लिम धर्मगुरू आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी नुपुर शर्माच्या अटकेची मागणी केली आहे.

India belongs to Hindus & Sanatana will stay here
Sadhvi Pragya news : भारताच्या सनातन परंपरेला कायम ठेवू, म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Sadhvi Pragya news : भारताच्या सनातन परंपरेला कायम ठेवू, म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर
  • विधर्मी (दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या विचारांचे) वारंवार हिंदूच्या भावना दुखावणारी कृत्य करत असतात
  • विधर्मींना दुखावणारे किंवा विरोध करणारे विचार जाहीर केले की हे हल्ले करतात, धमक्या देतात किंवा हत्या करतात

India belongs to Hindus & Sanatana will stay here:BJP's Sadhvi Pragya in Bhopal :  पैगंबराविषयीच्या नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. मुस्लिम धर्मगुरू आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी नुपुर शर्माच्या अटकेची मागणी केली आहे. या वातावरणात भारतीय जनता पार्टीच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांचे एक वक्तव्य आले आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी जाहीरपणे नुपुर शर्मा यांचे समर्थन केले आहे. 

विधर्मी (दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या विचारांचे) वारंवार हिंदूच्या भावना दुखावणारी कृत्य करत असतात. सिनेमाच्या माध्यमातूनही विधर्मी हिंदुंच्या भावना दुखावणारी कृत्य करतात. पण यांना दुखावणारे किंवा विरोध करणारे विचार जाहीर केले की हे हल्ले करतात, धमक्या देतात किंवा हत्या करतात. कमलेश तिवारी हे याचे एक उदाहरण आहे. भारत हा हिंदुंचा देश आहे आणि इथे 'सनातन'चे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे; अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी त्यांचे म्हणणे मांडले.

कोण होते कमलेश तिवारी?

कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबर २०१९ रोजी लखनऊ येथे क्रूरपणे हत्या करण्यात आली. याआधी २०१५ मध्ये कमलेश तिवारी यांच्या एका वक्तव्याला विरोध करण्यासाठी मुस्लिम समुदाय रस्त्यावर आला होता. कमलेश तिवारींच्या वक्तव्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे मुस्लिम समुदायाचे म्हणणे होते. कमलेश तिवारी यांचे वक्तव्य पैगंबराचा अपमान असल्याचे मुस्लिम संघटनांचे आणि धर्मगुरुचे म्हणणे होते. घटनेच्या दिवशी कमलेश तिवारी स्थानिक पार्टी ऑफिसमध्ये बसले होते. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या दोघांच्या हातात मिठाई होती. आलेल्या दोघांनी भगवे कपडे घातले होते. एखाद्या विषयावर बोलायचे असेल असे समजून कमलेश तिवारी यांनी दोघांना भेटण्यासाठी बोलावले. भेटीदरम्यान हल्लेखोरांनी थेट कमलेश तिवारी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी