India China border | हिमाचल प्रदेशाला लागून चीनच्या जोरदार हालचाली, रस्ते-पूल आणि हेलीपॅडचे बांधकाम

India China border news: चीनने हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा आणि टेहळणी क्षमतेत वाढ केली आहे. किन्नौर आणि लाहौल स्पिति जिल्ह्यांजवळ मागील एक वर्षापासून चीन रस्ते निर्माण, पूल बांधणे (Infrastructure) आणि हेलीपॅडची (Helipad)निर्मिती यासारखी कामे करतो आहे. हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या २४० किमी लांबीच्या चीनी सीमेवर १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या काळातदेखील शांतता होती

India-China Border in Himachal Pradesh
हिमाचल प्रदेशाला लागून सीमेवर चीनच्या जोरदार हालाचाली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनने (China)हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh)वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) कुरापती काढण्यास सुरूवात केली
  • चीनकडून रस्ते निर्माण, पूल बांधणे (Infrastructure) आणि हेलीपॅडची (Helipad)निर्मिती यासारखी कामे
  • किन्नौर आणि लाहौल स्पिति या जिल्ह्यांची चीनबरोबर २४० किमीची सीमा

India China border news: लाहौल स्पिति : पूर्व लडाख (East Ladakh)आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) नंतर आता चीनने (China)हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh)वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) कुरापती काढण्यास सुरूवात केली आहे. हिमाचल प्रदेशातील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील भागात चीन सातत्याने आपल्या सैन्यदलाची संख्या वाढवतो आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील एलएसीला लागून असलेल्या किन्नौर आणि लाहौल स्पिति जिल्ह्यांजवळ मागील एक वर्षापासून चीन रस्ते निर्माण, पूल बांधणे (Infrastructure) आणि हेलीपॅडची (Helipad)निर्मिती यासारखी कामे करतो आहे. या कामाला वेग आणण्यासाठी चीन एलएसीजवळ सैन्याच्या (Chinese Army) चौक्यादेखील बनवतो आहे. (India-China : China developing infrastructure like roads, bridges & Helipads adjacent to Himachal Pradesh) 

लाहौल स्पिती आणि किन्नौरला लागून सीमेजवळ हालचाली

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना देण्यात आलेल्या अहवालात राज्य पोलिसांनी दोन जिल्ह्यांमध्ये एलएसीवर पायाभूत सुविधा आणि चौक्यांची बांधणी केली जात असल्याचे म्हटले आहे. हिमाचल प्रदेशचे डीजीपी संजय कुंडू यांनी म्हटले आहे की मागील एका वर्षात चीनी सैन्याच्या हालचाली या भागात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चीनने हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा आणि टेहळणी क्षमतेत वाढ केली आहे. किन्नौर आणि लाहौल स्पिति या जिल्ह्यांची चीनबरोबर २४० किमीची सीमा आहे. यामध्ये लाहौल स्पितिच्या चुमार भागात ८० किमी आणि किन्नौरच्या भागात १६० किमी लांबीची सीमा आहे.

सीमेवरील गावांजवळ बांधकामे

प्रसिद्धी माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार चीनने चुरुपमध्ये परेचु नदीच्या उत्तर किनाऱ्यावर नवीन रस्ता बांधला आहे. याशिवाय चीन शाक्तोट, चुरुप आणि डनमुर गावांमध्येदेखील वेगाने बांधकाम करतो आहे. चीनने चुरुप गावांमध्ये नवीन बिल्डिंगसह टेहळणीसाठी चौकीदेखील बांधली आहे. चीनने क्योरब्रांग दर्रेजवळ री गावात ५ किमी लांबीचा रस्ता बांधला आहे. पीएलएने आणखी एका गावाजवळ रस्त्याचे चौपदरीकरण केले आहे. तर शेजारील गावाजवळ नवीन रस्ता बांधला आहे. भारतीय सैन्याला सप्टेंबर महिन्यात किन्नौरच्या गुंगरंग जवळ ८ पीएलए सैनिकांची एका तुकडी आढळून आली होती. दोन्ही सैन्याने त्यावेळेस 'वापस जाओ'चे नारे लावले होते.

१९६२च्या युद्धातदेखील होती शांतता

हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या २४० किमी लांबीच्या चीनी सीमेवर १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या काळातदेखील शांतता होती. मात्र आता मागील काही वर्षांपासून चीनी सैन्याने या भागातील हालचालींमध्ये मोठी वाढ केली आहे. चीनी हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई क्षेत्रात उल्लंघन केल्याचेही आढळून आले आहे. स्पितिच्या एका गावाजवळ खडकांवर चीनी खुणा सापडल्या होत्या. एलएसीच्या भारतीय बाजूकडे १ किमीमध्ये आतमध्ये पीएलएकडून सोडण्यात आलेल्या बियरच्या बाटल्या आणि इतर बाटल्या आढळून आल्या होत्या. चीन सातत्याने भारतीय भूभागावर अतिक्रमण करत तो बळकावण्याचा प्रयत्न करतो आहे. सीमा भागात कुरबुरी करत भारतीय जमीनीवर दावा सांगण्याचा चीनचा नेहमी प्रयत्न असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी