India-China: चीनचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलला; चीनच्या मावळत्या राजदूतांनी केला खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 18:35 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

India-China: चीनने भारताविषयी आडमुठी भूमिका सोडल्याचे दिसत आहे. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनीही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चांगला ताळमेळ असून, द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मदत मिळेल, असे म्हटले आहे.

India china relations
भारताविषयी चीनची नरमाईची भूमिका  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. त्यानंतर चीनचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. चीनने भारताविषयी आडमुठी भूमिका सोडल्याचे दिसत आहे. भारतासाठी हा खूप मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात चीन अडथळा ठरत होता. पण, परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटले आहेत. गेल्या वर्षी चीनमधील वुहानमध्ये दोन नेत्यांमध्ये झालेली भेट चर्चेत होती. आता चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये खूप चांगला ताळमेळ असून, द्विपक्षीय संबंध सुधारण्याला यामुळे मदत मिळेल, असे म्हटले आहे.

 

 

ही तर भावा भावांची भाडणं

भारतात चीनचे राजदूत म्हणून दोनवेळा जबाबदारी पार पडलेले लुओ आता चीनला परत जात आहेत. तेथे त्यांना बढती मिळाली असून त्यांना उपमंत्र्याचा दर्जा देण्यात येणार आहे. नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते मायदेशी चीनला जाणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांना रुळावर आणण्यासाठी लुओ यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांनी चीनला जाण्यापूर्वी डोकलामसह विविध मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा केली. ते म्हणाले, ‘दोन देशांमध्ये होणारी ही लढाईल दोन भावांमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या वादांसारखी होती. पण, आता हे वाद सुटलेले आहेत. दोन बलाढ्य शेजारी राष्ट्रांमध्ये एखाद्या गोष्टीवरून काही तरी खटके उडणे स्वाभावीक आहे. हे खटके म्हणजे, एकाच छता खाली राहणाऱ्या दोन भावांमध्ये होणाऱ्या मतभेदांसारखे आहेत. अशा छोट्या छोट्या समस्यांमुळे काही फरक पडत नाही. आम्ही या समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम केले आहे. ज्यामुळे द्विपक्षीय संबंध सामान्य होण्यासाठी मदत होणार आहे.’

निवडणुकीनंतरही संबंध कायम राहतील

लुओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष जिनपिंग यांच्यातील चांगल्या संबंधांचा हवाला दिला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग गेल्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी १७ वेळा भेटले आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांमध्ये अधिकृत दौरे केले आहेत. २०१८मध्ये एप्रिल महिन्यात वुहान येथे दोन्ही नेते भेटले त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल्डमधून या भेटीसाठी वेळ दिला होता. हे खूप महत्त्वाचं आहे. या दोन्ही नेत्यांनी सीमावादावरही चर्चा केली आहे. दोन्ही देशांना आपसातील संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता ठेवणे गरजेचे आहे.’ दोन्ही देशांमध्ये व्यापार संबंध वाढवणे आणि वाद दूर करण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे लुओ यांनी सांगितले. भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतरही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध राहतील, अशी अपेक्षा लुओ यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India-China: चीनचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलला; चीनच्या मावळत्या राजदूतांनी केला खुलासा Description: India-China: चीनने भारताविषयी आडमुठी भूमिका सोडल्याचे दिसत आहे. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनीही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चांगला ताळमेळ असून, द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मदत मिळेल, असे म्हटले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक 
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक