India China Tawang Clash video: भारतीय सैन्याचा पराक्रम, शौर्य आणि वीरता पुन्हा एकदा तवांग सेक्टरमध्ये पहायला मिळाली. 9 डिसेंबर रोजी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यात झटापट झाली होती. या झटापटी दरम्यान आता सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच झटापटीचा असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ तवांग झटापटीचा असल्याचं सांगत सोशल मीडियात जोरदार शेअर करण्यात येत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, भारतीय सैन्य चिनी सैन्याला चक्क लाठ्या-काठ्यांनी झोडपून काढत आहेत. (India-China soldiers clash in Tawang viral video shows Indian army beats to Chinese troops watch it)
भारतीय सैन्याकडून होत असलेला लाठ्या-काठ्यांचा मारा पाहून चिनी सैनिकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. चिनी सैन्य अतिक्रमण करत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी भारतीय सैन्याची अतिरिक्त तुकडी पाठवण्यात आली. आधी भारतीय सैन्याची त्या ठिकाणी केवळ पेट्रोलिंग टीम होती त्यानंतर आणखी एक क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली.
भारत-चीन विवाद के बीच तवांग #ArmyBaseCamp पर कैसे हैं हालात? देखिए, Ground Report — Times Now Navbharat (@TNNavbharat) December 14, 2022
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat https://t.co/ogFsKf9YX1#TimesNowNavbharatOriginals #TNNOriginals @priyanktripathi #IndiaChinaFaceOff #TawangClash pic.twitter.com/RDYCe42VUE
हे पण वाचा : या 7 गोष्टी पती किंवा बॉयफ्रेंड आपल्या पार्टनरपासून लपवतात
पेट्रोलिंग टीम, क्विक रिअॅक्शन टीमसोबतच LAC वर भारतीय सैन्यासोबतच झालेल्या झटापटीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत असून सोशल मीडियात शेअर करण्यात येत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना भारतीय सैन्याचं जोरदार कौतुक करण्यात येत आहे. भारतीय सैन्याचा आक्रमकपणा पाहून चिनी सैन्याने घटनास्थळावरुन अर्ध्या तासाच्या आत पळ काढला.
हे पण वाचा : तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स
भारतीय सैन्याकडून चिनी सैन्याला लाठ्या-काठ्यांनी झोडपून काढण्यात आले. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
चिनी सैन्याने यांग्सी परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात जोरदार बर्फवृष्टी होत होती आणि त्यामुळे या भागातून भारतीय सैन्याच्या काही तुकड्या मागे हटल्या होत्या. चीनने याच संधीचा फायदा घेत आपल्या सैन्याकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने या चिनी सैन्याला पदडले आणि पळवून लावले.