India Vaccination : भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात ‘200 कोटी’ मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा केला पार

भारताच्या देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ऐतिहासिक कामगिरी करत 200-कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशभरात एकूण २०० कोटी १५ लाख ६३१मात्रा देण्यात आल्या आहेत. 2 कोटी 63 लाख 26 हजार 111 सत्रांतून हा टप्पा गाठण्यात आला. 

corona vaccination
लसीकरण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारताच्या देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ऐतिहासिक कामगिरी करत 200-कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
  • देशभरात एकूण २०० कोटी १५ लाख ६३१मात्रा देण्यात आल्या
  • 2 कोटी 63 लाख 26 हजार 111 सत्रांतून हा टप्पा गाठण्यात आला. 

India Vaccination : नवी दिल्ली : भारताच्या देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ऐतिहासिक कामगिरी करत 200-कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशभरात एकूण २०० कोटी १५ लाख ६३१मात्रा देण्यात आल्या आहेत. 2 कोटी 63 लाख 26 हजार 111 सत्रांतून हा टप्पा गाठण्यात आला. (india crossed more than 2 billion corona vaccination)

या देशव्यापी मोहीमेत क्षमता निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय देखील केले गेले. कोविड19 लसींच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी विद्यमान पुरवठा साखळी सांधण्यात आणि सक्षम करण्यात आली. तसेच, लस वितरणावर प्रभावी देखरेख ठेवण्यात गेली. उपलब्ध लस मात्रा आणि सिरिंजच्या योग्य वापरावर भर दिला गेला. 

भारतातील नागरिकांना देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत मोफत आणि ऐच्छिक लस उपलब्ध व्हावी यासाठी हर घर दस्तक, कार्यालयामध्ये लसीकरण केंद्र, शाळा आधारित लसीकरण, ओळखपत्रे नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण, घराजवळील लसीकरण केंद्र आणि फिरते लसीकरण चमू यांसारखे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. 71% कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र ग्रामीण भागात स्थित आहेत तर 51% पेक्षा जास्त लसीच्या मात्रा महिलांना देण्यात आल्या आहेत. भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने भौगोलिक आणि लैंगिक समानता देखील सुनिश्चित केली आहे. 

देशभरात कोविड रुग्णसंखेत घट झाली असली तरीही, सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी जवळपास 9 महिने लागले आणि 200 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 9 महिने लागले यावरून हे समजून येते. 17 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरणाने 2.5 कोटी मात्रांचा एका दिवसातला विक्रमी लसीकरण टप्पा गाठला होता. 

15 जुलै 2022 रोजी, केंद्र सरकारने सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर (CVCs) सर्व पात्र प्रौढ नागरिकांना मोफत क्षमता वृद्धी मात्रा देण्यासाठी 75 दिवसांचा 'कोविड लसीकरण अमृत महोत्सव' सुरू केला. आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, ‘मिशन मोड’ मध्ये कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या क्षमता वर्धक मात्रा लसीकरणाची गति वाढावी या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी