150-crore Covid vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने ओलांडला १५० कोटींचा टप्पा

India crosses 150-crore Covid vaccination mark : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने १५० कोटी डोसचा टप्पा ओलांडला. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात आतापर्यंत १ अब्ज ५० कोटी ६५ लाख ५५ हजार ५३० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

India crosses 150-crore Covid vaccination mark
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने ओलांडला १५० कोटींचा टप्पा 
थोडं पण कामाचं
  • कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने ओलांडला १५० कोटींचा टप्पा
  • भारतात आतापर्यंत १ अब्ज ५० कोटी ६५ लाख ५५ हजार ५३० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
  • ८८ कोटी १ लाख ४६ हजार ५५० जणांना पहिला तर ६२ कोटी ६४ लाख ८ हजार ९८० जणांना दुसरा डोस

India crosses 150-crore Covid vaccination mark : नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने १५० कोटी डोसचा टप्पा ओलांडला. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात आतापर्यंत १ अब्ज ५० कोटी ६५ लाख ५५ हजार ५३० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८८ कोटी १ लाख ४६ हजार ५५० जणांना लसचा पहिला डोस तर ६२ कोटी ६४ लाख ८ हजार ९८० जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

देशातील १५ ते १७ वयोगटातील २ कोटी १९ लाख ७२ हजार ७२८ जणांना लसचा पहिला डोस टोचण्यात आला. तसेच १८ ते ४४ वयोगटातील देशातल्या ५८ कोटी ५८ लाख ६६ हजार ३४ जणांना लसचे डोस टोचण्यात आले. भारतातल्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ३५ कोटी ६८ हजार १३० जणांनाही लसचे डोस टोचण्यात आले.

भारतात सर्वाधिक लसीकरण अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये झाले. उत्तर प्रदेशमध्ये २१ कोटी ५ लाख ८६ हजार ३९३ लसचे डोस टोचण्यात आले. महाराष्ट्रात १३ कोटी ८३ लाख ८ हजार ३० लसचे डोस टोचण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये १० कोटी ८९ लाख ५५ हजार २१४ लसचे डोस टोचण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये १० कोटी ५२ लाख ३५ हजार ४३ लसचे डोस टोचण्यात आले. बिहारमध्ये १० कोटी ३१ लाख ४२ हजार ५७१ लसचे डोस टोचण्यात आले.

देशात १५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सोमवार १० जानेवारी २०२२ पासून हेल्थ वर्कर्स (आरोग्य क्षेत्राशी संबंधित डॉक्टर आणि इतर अधिकारी-कर्मचारी), फ्रंटलाइन वर्कर्स (कोरोना संकटात आघाडीवर काम करणारे) यांना लसचा तिसरा डोस दिला जाईल. सरकारने जाहीर केलेल्या आजारांच्या यादीतील किमान एक आजार असलेल्या साठ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून द्यायचा डोस टोचण्याची सुरुवात पण १० जानेवारीपासून होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी