भारतात ११९ दिवसांत १८ कोटी लोकांना दिली कोरोना लस

भारतात ११९ दिवसांत १८ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस दिला.

India crosses 18 Cr Cumulative Vaccination Coverage
भारतात ११९ दिवसांत १८ कोटी लोकांना दिली कोरोना लस 

थोडं पण कामाचं

  • भारतात ११९ दिवसांत १८ कोटी लोकांना दिली कोरोना लस
  • १३ कोटी ९३ लाख ६१ हजार २१ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस
  • ४ कोटी १० लाख ६८ हजार २४० जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस

नवी दिल्ली: भारतात ११९ दिवसांत १८ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस दिला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार १३ कोटी ९३ लाख ६१ हजार २१ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ४ कोटी १० लाख ६८ हजार २४० जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस देण्यात आला. भारतात आतापर्यंत १८ कोटी ४ लाख २९ हजार २६१ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला. India crosses 18 Cr Cumulative Vaccination Coverage

देशातील ९६ लाख २७ हजार १९९ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना (हेल्थकेअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ६६ लाख २१ हजार ६७५ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना (हेल्थकेअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील १ कोटी ४३ लाख ६३ हजार ७५४ फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ८१ लाख ४८ हजार ७५७ फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील १८ ते ४४ वयोगटातील ४२ लाख ५५ हजार ३६२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला.

देशातील ४५ ते ६० वयोगटातील ५ कोटी ६७ लाख ९९ हजार ३८९ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच या वयोगटातील ८७ लाख ५० हजार २२४ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील ६० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ५ कोटी ४३ लाख १५ हजार ३१७ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच या वयोगटातील १ कोटी ७५ लाख ४७ हजार ५८४ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले.

शुक्रवार १४ मे २०२१ रोजी देशात १० लाख ७९ हजार ७५९ डोस देण्यात आले. यापैकी ८ हजार ४६२ हेल्थकेअर वर्कर्सना पहिला डोस तर १६ हजार ३३२ हेल्थकेअर वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला. तसेच ३७ हजार ४१२ फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला डोस तर ३० हजार ३७६ फ्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला. 

भारतातील १८ ते ४४ वयोगटातील ३ लाख २५ हजार ७१ जणांना लसचा पहिला डोस दिला. तसेच ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ७८ हजार ५० जणांना लसचा पहिला डोस तर १ लाख ९९ हजार ८२९ जणांना लसचा दुसरा डोस देण्यात आला.

देशातील ६० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ६७ हजार ७८६ जणांना लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच २ लाख १६ हजार ४४१ जणांना लसचा दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात देशातील ६ लाख १६ हजार ७८१ जणांना लसचा किमान एक डोस देण्यात आला. तसेच ४ लाख २६ हजार ९७८ जणांना लसचा दुसरा डोस देण्य़ात आला. 

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. सध्या देशात कोॅक्सिन आणि कोविशिल्ड यांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. लवकरच स्पुटनिक V या रशियातून आणलेल्या लसीचाही वापर सुरू होणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तसेच लस निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्राने देशात लस निर्मिती करणाऱ्या प्रत्येक कंपनीला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या जोरावर लस कंपन्या त्यांची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी