Rafale: राफेल विमान लवकरच भारतीय ताफ्यात येणार; पाकिस्तानला धडकी भरणार

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 12, 2019 | 14:55 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Rafale: भारतीय हवाई दला सध्या सुखोई ३० एमकेआय विमान असून त्याला आता राफेलची जोड मिळाली तर, पाकिस्तानच नव्हे, कोणत्याही शत्रू राष्ट्राला धडकी भरवण्याची क्षमता भारताकडे असेल, असे हवाई दलाकडून सांगण्यात येत आहे.

rafale aircraft
राफेल विमान लवकरच भारती ताफ्यात   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी उडवले राफेल विमान
  • लवकरच भारतीय ताफ्यात येणार फ्रान्सचे राफेल विमान
  • राफेल चाचणीसह भारत-फ्रान्स युद्ध सराव

नवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल विमानाच्या खरेदीवरून भारतात गेले वर्षभर गोंधळ निर्माण झाला. राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्य केलं. राफेल डीलची कितीही निगेटिव्ह चर्चा झाली असली तरी, फ्रान्सकडून राफेल या लढाऊ विमानांची पहिली डिलिव्हरी लवकरच भारतीय हवाई दलाला मिळणार आहे. भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांनी हे सक्षम मल्टीरोल फायटर राफेल विमान उडवूनही पाहिले आहे. हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी राफेल विमान उडवले आहे. भारतीय हवाई दलाकडे सध्या सुखोई ३० एमकेआय विमान असून त्याला आता राफेलची जोड मिळाली तर, कोणत्याही शत्रू राष्ट्राला धडकी भरवण्याची क्षमता भारताकडे असेल, असे हवाई दलाकडून सांगण्यात येत आहे.

 

 

‘पाकिस्तान आता धाडस करणार नाही’

यासंदर्भात एएनआय न्यूज एजन्सीने विशेष रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार भारत आणि फ्रान्स यांच्यात युद्ध अभ्यास सुरू आहे. त्यात व्हाइस चीफ एअर मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी यांनी राफेल विमान उडवून पाहिल्यानंतर एएनआयशी संवाद साधला. विमानाचा अनुभव शेअर करताना भदौरिया म्हणाले, ‘पाकिस्तान आता भारताच्या वाट्याला जाण्याचं धाडस करणार नाही. कारण जर पाकिस्तानने काही कुरघोडी केली तर, त्याला धडकी भरेल अशी लढाऊ विमाने आपल्याकडे आहेत. त्याला या विमानांचा सामना करावा लागले आणि पाकिस्तानला ते महागात पडेल. कारण या लढाऊ विमानांच्या हल्ल्यात जे नुकसान होईल, ते प्रचंड असेल.’ भारत आणि फ्रान्स यांच्यात सहा युद्ध अभ्यास होणार आहेत. त्यासाठी त्यासाठी भदौरिया उपस्थित राहिले आहेत. भदौरिया यांनी सांगितले की, जेव्हा सुखोई ३० एमकेआय विमान आणि राफेल युद्धात उतरतील तेव्हा, पाकिस्तानच काय इतर कोणत्याही शस्त्रू राष्ट्राला त्याचे आव्हान पेलणार नाही. राफेल आणि सुखोईची जोडी कोणत्याही देशाला धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे.

 

 

‘पाकला किंमत मोजावी लागेल’

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हवाई सीमेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यावर भदौरिया म्हणाले, ‘आपल्याकडे खूप मोठी आणि चांगली शस्त्रास्त्रे आहेत. जर, पाकिस्तानने आपली कळ काढण्याचे धाडस केलेच तर, त्याला जबर किंमत मोजावी लागेल.’ राफेल डील संदर्भात ज्या भारतीय टीमने फ्रान्सशी चर्चा केली होती. त्या टीमचे भदौरिया प्रमुख होते. भारताने बालाकोट एअरस्ट्रईक केल्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भारताच्या मिग-२१ आणि सुखोई विमानांनी परतवून लावले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Rafale: राफेल विमान लवकरच भारतीय ताफ्यात येणार; पाकिस्तानला धडकी भरणार Description: Rafale: भारतीय हवाई दला सध्या सुखोई ३० एमकेआय विमान असून त्याला आता राफेलची जोड मिळाली तर, पाकिस्तानच नव्हे, कोणत्याही शत्रू राष्ट्राला धडकी भरवण्याची क्षमता भारताकडे असेल, असे हवाई दलाकडून सांगण्यात येत आहे.
Loading...
Loading...
Loading...