रशियाचा चीनला दणका, एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित

Russia Stops Delivery Of S 400 Missiles To China चीनला द्यायच्या एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा रशियाने अडवून धरला आहे.

India Friend Russia Stops Delivery Of S 400 Missiles To China
रशियाचा चीनला दणका, एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित 
थोडं पण कामाचं
  • रशियाचा चीनला दणका, एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित
  • रशियाने दिले कोरोना संकटाचे कारण
  • रशियाचा निर्णय भारतासाठी लाभदायी

नवी दिल्ली: फ्रान्समधून (France) पाच राफेल (rafael plane) लढाऊ विमानं भारतासाठी रवाना झाली आहे. भारत (India) राफेल सज्ज होत असताना चीनला (China) रशियाने (Russia) दणका दिला आहे. चीनला द्यायच्या एस ४०० क्षेपणास्त्रांचा (S 400 Missile) पुरवठा रशियाने अडवून धरला आहे. (Russia Stops Delivery Of S 400 Missiles To China) 

रशियाने दिले कोरोना संकटाचे कारण

जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या एस ४०० क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा रशिया चीनला करणार होता. मात्र भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने चीनला द्यायच्या एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा अडवून धरला आहे. रशियाने अधिकृतरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. पुरवठा स्थगित करण्यासाठी रशियाने कोरोना संकटाचे कारण दिले आहे.

एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा हाताळण्यासाठी चिनी सैन्याला प्रशिक्षण द्यावे लागेल. नंतर त्यांच्या कामाची पाहणी करावी लागले. या प्रक्रियेसाठी निवडक मंडळींनी चीनमधून रशियात जावे लागेल नंतर कामाची पाहणी करण्यासाठी रशियातील तज्ज्ञांना चीनमध्ये जावे लागेल. कोरोना संकटात असा दौरा करणे धोक्याचे असल्यामुळे एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा लांबणीवर टाकल्याचे रशियाकडून चीनला कळवण्यात आले आहे. 

रशियाचा निर्णय भारतासाठी लाभदायी

रशियाच्या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया समजलेली नाही. मात्र रशियाचा निर्णय भारतासाठी लाभदायी ठरणार आहे. रशियाने पहिल्या टप्प्यात रशियाला निवडक एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला. आणखी क्षेपणास्त्र लवकरच दिली जाणार होती. मात्र हा पुरवठा लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर भारताने रशियाकडे एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा तातडीने करा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियात जाऊन रशियाच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली होती. 

एस ४०० सध्याचे सर्वोत्तम क्षेपणास्त्र

एस ४०० क्षेपणास्त्र शत्रुच्या क्षेपणास्त्रांना आणि विमानांना हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. सध्या जगात एस ४०० च्या तोडीचे दुसरे क्षेपणास्त्र अस्तित्वात नाही, असे अनेक संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची पॅट्रीअट (patriot missile) आणि इस्रायलची अॅरो (arrow missile) ही क्षेपणास्त्र तसेच रशियाची क्लब क्षेपणास्त्र (klub missile) ही एस ४०० च्या तुलनेत कमी क्षमतेची आहेत. 

आकाश क्षेपणास्त्राच्या मर्यादेमुळे भारताने खरेदी केले एस ४००

भारताने शत्रुच्या क्षेपणास्त्रांना आणि विमानांना हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी आकाश (akash missile) हे स्वदेशी क्षेपणास्त्र तयार केले आहे. मात्र एस ४०० क्षेपणास्त्राचा पल्ला ४०० किमी आहे तर आकाश ३५ ते ४० किमी पर्यंत अचूक मारा करण्यासाठी सक्षम आहे. आकाशच्या नव्या आवृत्तीवर काम सुरू आहे. केंद्र सरकारने सुरक्षेच्या बाबतीतली ही परिस्थिती लक्षात घेऊन एस ४०० खरेदीचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि रशिया यांच्यात १५ ऑक्टोबर २०१६ रोजी एस ४०० संदर्भातला दोन देशांच्या पातळीवरचा करार झाला. नंतर अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारने ५ ऑक्टोबर २०१८ रोजी कराराला अंतिम स्वरुप दिले. करारानुसार रशिया भारताला ऑक्टोबर २०२० मध्ये एस ४०० देईल असे ठरले. मात्र कोरोना संकटामुळे हा पुरवठा किमान एक वर्ष लांबणीवर टाकण्याचे संकेत रशियाने दिले. यानंतर भारत आणि रशिया यांच्यात उच्च पातळीवर चर्चा झाली. या चर्चेअंती रशियाने मर्यादीत प्रमाणात एस ४००चा पुरवठा लवकर करण्याचे आश्वासन भारताला दिले. हे आश्वासन मिळाल्यानंतर राजनाथ सिंह भारतात परतले आणि महिन्याभरानंतर रशियाने चीनला द्यायच्या एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा अडवून धरल्याचे जाहीर केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी