“२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम”; आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त विधान

Mani Shankar Aiyar''s controversial statement:  २०१४ पासून भारत अमेरिकेचा (America ) गुलाम(Slave) झाला आहे, असा उल्लेख काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Congress leader Mani Shankar Aiyer) केला आहे. इंडो-रशिया (Indo-Russia) फ्रेंडशिप (Friendship)सोसायटीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Congress leader Mani Shankar Aiyar
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच भारताविषयी वादग्रस्त विधान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या ७ वर्षापासून पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही.- मणिशंकर अय्यर
  • २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम- काँग्रेस नेते अय्यर
  • अकबरला आम्ही परकं मानत नाही - मणिशंकर अय्यर

Mani Shankar Aiyar''s controversial statement:   नवी दिल्ली : अभिनेत्री (Actress) कंगना रणौतने ( kangana ranaut) काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल (Freedom) वादग्रस्त (controversial) वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद अजूनही उमटत असताना आता काँग्रेस नेत्यानेही असंच वादग्रस्त विधान केलं आहे. २०१४ पासून भारत अमेरिकेचा (America ) गुलाम(Slave) झाला आहे, असा उल्लेख काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Congress leader Mani Shankar Aiyer) केला आहे. इंडो-रशिया (Indo-Russia) फ्रेंडशिप (Friendship)सोसायटीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

या कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, २०१४ पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपले विधान सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला. अय्यर म्हणाले की, “गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचलं पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. 

यापूर्वी मणिशंकर अय्यर यांनी मध्ययुगीन इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. “अकबरने देशावर ५० वर्षे राज्य केले. हे लक्षात घेऊन मी राहत असलेल्या रस्त्याचे नाव अकबर रोड असे ठेवले. आमची हरकत नव्हती. महाराणा प्रताप रस्ता बनवा असे आम्ही कधीच म्हटले नाही, कारण आम्ही अकबराला आपलाच मानतो आणि त्याला परकं मानत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी