भारतात अमेरिका इंग्लंडपेक्षा जास्त महिला वैमानिक

India has more women pilots than US and UK says Anand mahindra : भारतात अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त महिला वैमानिक आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. 

India has more women pilots than US and UK says Anand mahindra
भारतात अमेरिका इंग्लंडपेक्षा जास्त महिला वैमानिक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात अमेरिका इंग्लंडपेक्षा जास्त महिला वैमानिक
  • जगात सर्वाधिक व्यावसायिक महिला वैमानिक भारतात
  • पहिल्या भारतीय व्यावसायिक महिला वैमानिक निवेदिता भसीन

India has more women pilots than US and UK says Anand mahindra : भारतात अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त महिला वैमानिक आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. 

जगात सर्वाधिक व्यावसायिक महिला वैमानिक असलेल्या देशांची यादी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून जाहीर केली. यात प्रत्येक देशातील एकूण व्यावसायिक वैमानिकांपैकी व्यावसायिक महिला वैमानिकांची टक्केवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार भारतात एकूण व्यावसायिक वैमानिकांपैकी व्यावसायिक महिला वैमानिकांचे प्रमाण 12.4 टक्के आहे. आयर्लंडमध्ये हेच प्रमाण 9.9 टक्के, दक्षिण आफ्रिकेत 9.8 टक्के, ऑस्ट्रेलियात 7.5 टक्के, कॅनडात 7 टक्के, जर्मनीत 6.9 टक्के, अमेरिकेत 5.5 टक्के, इंग्लंडमध्ये 4.7 टक्के, न्यूझीलंडमध्ये 4.5 टक्के, कतारमध्ये 2.4 टक्के, जपानमध्ये 1.3 टक्के, सिंगापूरमध्ये 1 टक्का आहे. 

बाप-लेकीची कमाल !, भारतीय वायुसेनेच्या इतिहासात प्रथमच वडील आणि मुलीने उडवले फायटर जेट

देशाच्या आशा-आकांक्षा आपल्या मुलींवर अवलंबून : राष्ट्रपती

एकूण व्यावसायिक वैमानिकांपैकी व्यावसायिक महिला वैमानिकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. ही बाब भारतासाठी अतिशय अभिमानाची आहे. भारतात 1989 मध्ये निवेदिता भसीन (Nivedita Bhasin) या व्यावसायिक वैमानिक झाल्या.  निवेदिता भसीन या भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक आहेत. भसीन यांच्यापासून सुरू झालेली भारतातील व्यावसायिक महिला वैमानिकांची थोर परंपरा उत्तरोत्तर प्रगती करत आहेत. 

निवेदिता भसीन आजही त्यांच्या जुन्या दिवसांविषयी सांगताना आठवणीत रमून जातात. जेव्हा भसीन कॉकपीटमध्ये वैमानिक म्हणून बसायच्या त्या प्रत्येकवेळी सोबत त्या एक पुरुष सहवैमानिक असेल याची खबरदारी घ्यायच्या. कारण त्या काळात महिला वैमानिकावर भारतीय प्रवाशांना विश्वास वाटत नव्हता. यामुळे प्रवाशांच्या मानसिकतेचा विचार करून भसीन ही खबरदारी घेत होत्या. आज परिस्थिती बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी तर एक प्रवासी विमान असेही होते ज्यात वैमानिक आणि सहवैमानिकासह सर्व क्रू हे महिला सदस्यच होते. भारताने हा एवढा मोठा बदल अनुभवला आणि स्वीकारला आहे.

लैंगिक समानता यादीत भारत जगात 146 देशांमध्ये 135 वा आहे. पण महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी आहे. एनसीसीमध्ये महिला एअर विंग मधील सदस्यांची संख्या वाढत आहे. भारताच्या नौदलात आणि हवाई दलात महिला वैमानिक आहेत. भारताच्या महिला वैमानिक सुखोई 30 हे लढाऊ विमान प्रभावीरित्या हाताळत आहेत. लढाऊ आणि मालवाहक हेलिकॉप्टर हाताळणाऱ्या टीममध्येही महिला वैमानिक आहेत. 

भारतात व्यावसायिक महिला वैमानिकांसाठी विमान कंपन्यांनी विशेष सुविधा दिल्या आहेत. महिला वैमानिकांना बाळंतपणात 26 महिन्यांची भरपगारी सुटी मिळते. महिला वैमानिकांच्या मुलांसाठी विमान कंपन्यांनी पाळणाघराची सोय केली आहे. मुल 5 वर्षांचे होईपर्यंत महिला वैमानिकांसाठी कामाच्या वेळा पण सोयीच्या असतात. तसेच एका कॅलेंडर महिन्यात महिला वैमानिकांना 2 आठवड्याची सुटी दिली जाते. रात्री अपरात्री कामावर येणाऱ्या जाणाऱ्या महिला वैमानिकांसाठी कार, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक अशा सोयी दिल्या जातात. महिला वैमानिक आणि महिला क्रू यांना गरोदर असतानाच्या काळात प्रशासकीय ड्युटी देऊन जास्तीत जास्त विश्रांती मिळेल अशी व्यवस्था केली जाते. तसेच किमान 6 महिने भर पगारी सुटी दिली जाते. या सोयीसुविधांमुळे भारतातील महिला वैमानिकांच्या संख्येत वाढ होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी