तिरंगा फडकवणार असाल तर तुम्हाला हे नियम वाचलेच पाहिजेत

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 18:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

विविधतेने नटलेल्या भारत देशाला एकसंघ करणाऱ्या तिरंग्यालाही एक इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी झेंड्याच्या मध्ये पांढरा रंग आणि चरखा जोडण्याचा सल्ला गांधीजींनी दिला होता. ही कल्पना लाला हंसराज यांची होती.

Indian national flag
तिरंगा फडकवण्याचेही आहेत नियम  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

 • भारताने तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून कधी स्वीकारला? राष्ट्रध्वजाची संकल्पना कोणाची?
 • तिरंग्यासाठी महात्मा गांधी यांचे बहुमल्य योगदान; राष्ट्रध्वजाला आणले स्वदेशी स्वरूप
 • तिरंगा फडकवण्याचेही आहेत नियम; त्याचे व्हावे काटेकोर पालन

नवी दिल्ली: उद्या १५ ऑगस्ट २०९ रोजी भारत देश ७३वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी काश्मीर ते कन्याकुमारी गुजरात ते अरुणाचल प्रदेश अशा विस्तीर्ण भारत देशात तिरंगा डोलानं फडकवला जातो. इतर दिवशी सरकारी कार्यालयांवर फडकणारा तिरंगा त्या दिवशी शाळा, महाविद्यालये, कारखाने, ऑफिसेस या ठिकाणी फडकवला जातो. विविधतेने नटलेल्या भारत देशाला तिरंगा एकसंघ करतो. या तिरंग्यालाही एक इतिहास आहे. तसेच तो फडकवण्याचे काही नियम आहेत. जाणून घेऊया आपल्या तिरंग्याविषयी...

काय आहे तिरंग्यात?

 1. केशरी रंग शक्तीचे प्रतिक
 2. पांढरा रंग शांततेचे प्रतिक
 3. हिरवा रंग हरितक्रांतीचे प्रतिक
 4. तिरंग्यात मधल्या पांढऱ्या रंगात निळे अशोकचक्र
 5. झेंड्याची लांबी रुंदी 2:3 प्रमाणात असावी

तिरंगा फडकवण्याचे हे आहेत नियम

 1. २६ जानेवारी २००२मध्ये तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही भारतीय नागरिक, त्याच्या घरी, कारखान्यात, कार्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो. जिथे तिरंगा स्पष्ट दिसू शकतो त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात सन्मानाने तो फडकवला पाहिजे आणि सन्मानाने उतरवला पाहिजे, असा नियम आहे.
 2. व्यासपीठावर झेंडा फडकवत असताना फडकवणाऱ्याचा चेहरा श्रोत्यांच्या दिशेने आणि तिरंगा त्याच्या डाव्या बाजूलाचच असावा
 3. तिरंग्याला बिगुलच्या आवाजासोबत फडकवले जावे आणि उतरवले जावे
 4. तिरंग्यावर काहीही लिहिण्यास किंवा छापण्यास मनाई आहे.
 5. एखाद्या कारवर तिरंगा लावताना तो मधोमध किंवा गाडीच्या डाव्या बाजुला असावा
 6. फाटलेला तिरंगा फडकवू नये
 7. तिरंग्यासोबत कोणत्या दुसऱ्या झेंड्याला बरोबरीने किंवा तिरंग्यापेक्षा उंच फडकवू नये
 8. तिरंगा केवळ दुखवट्याच्या वेळीच अर्ध्यावर उतरवला जाईल
 9. सरकारी कार्यालयांवर तिरंगा रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत फडकवला जाईल
 10. विशेष घटनांच्या वेळी तिरंगा रात्रीही फडकवला जाऊ शकतो.
 11. तिरंग्याचा वापर जातीय फायद्यासाठी घेतला जाता कामा नये
 12. तिरंग्याला पाण्यात किंवा फरशीवर पडलेला ठेवता कामा नये
 13. तिरंग्याला रेल्वे, नाव किंवा विमानावर लपेटता येणार नाही

असा तयार झाला तिरंगा

देशाचा पहिला राष्ट्रीय ध्वज १९०६मध्ये तयार करण्यात आला. कोलकात्यातील बागान चौकात तो पडकवण्यात आला होता. त्यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. त्यात अर्धवट फुललेल्या कमळाचे चिन्ह होते. तसेच वंदेमातरम लिहिण्यात आले होते. पण, राष्ट्रध्वजाचा प्रवास १९२१पासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. देशाचा राष्ट्रध्वज असावा अशी कल्पना महात्मा गांधी यांनी दिली होती. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवा रंग होता. झेंड्याच्या मध्ये पांढरा रंग आणि चरखा जोडण्याचा सल्ला गांधीजींनी दिला होता. ही कल्पना लाला हंसराज यांची होती. त्यानंतर झेंड्याला स्वदेशी रूप आले. पहिल्यांदा हा झेंडा काँग्रेससाठी तयार करण्यात आला. त्यानंतर १९३१मध्ये राष्ट्रध्वज झाला. गांधीजींनीच नंतर चरख्याच्या जागी अशोक चक्राची कल्पना मांडली. राष्ट्रध्वजाला मंजुरी देण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने २२ जुलै १९४७ रोज राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याचा स्वीकार केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...