India Covid19 Tally देशात आढळले कोरोनाचे १०,९२९ नवे रुग्ण

India logs 10,929 new COVID-19 cases, 392 deaths in last 24 hours भारतात मागील २४ तासांमध्ये १० हजार ९२९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३९२ मृत्यूची नोंद झाली. तसेच मागील २४ तासांमध्ये देशातील १२ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले.

India logs 10,929 new COVID-19 cases, 392 deaths in last 24 hours
India Covid19 Tally देशात आढळले कोरोनाचे १०,९२९ नवे रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • India Covid19 Tally देशात आढळले कोरोनाचे १०,९२९ नवे रुग्ण
  • भारतात आढळलेल्या ३ कोटी ४३ लाख ४४ हजार ८७ रुग्णांपैकी ३ कोटी ३७ लाख २८ हजार ९२३ जण बरे झाले
  • भारताताली कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५४ हजार ८९६

India logs 10,929 new COVID-19 cases, 392 deaths in last 24 hours । नवी दिल्ली: भारतात मागील २४ तासांमध्ये १० हजार ९२९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३९२ मृत्यूची नोंद झाली. तसेच मागील २४ तासांमध्ये देशातील १२ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले. भारताताली कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५४ हजार ८९६ आहे. देशात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४ लाख ६० हजार २६८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात आढळलेल्या ३ कोटी ४३ लाख ४४ हजार ८७ रुग्णांपैकी ३ कोटी ३७ लाख २८ हजार ९२३ जण बरे झाले.

भारतात आतापर्यंत १०८ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. को-विन डॅशबोर्डनुसार, देशात १ अब्ज ८ कोटी १ लाख ७७ हजार ४७७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. भारतातील ७४ कोटी ३ लाख ६८ हजार ३९५ जणांना लसचा पहिला डोस तर ३३ कोटी ९८ लाख ९ हजार ८२ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी