India-China : LACवर भारताचा चौदा हजार फुटांवर युद्धाभ्यास, चीनला इशारा

भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control - LAC) चौदा हजार फुटांच्या उंचीवर युद्धाभ्यास करुन चीनला इशारा दिला आहे. हा युद्धाभ्यास सोमवार १ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आला.

India made China India realize its power at LAC, practiced at an altitude of 14 thousand feet
India-China : LACवर भारताचा चौदा हजार फुटांवर युद्धाभ्यास, चीनला इशारा 
थोडं पण कामाचं
  • LACवर भारताचा चौदा हजार फुटांवर युद्धाभ्यास, चीनला इशारा
  • युद्धाभ्यास सुरू होता त्यावेळी त्या भागात उणे २० अंश से. (- 20 degree celsius) तापमान
  • रक्त गोठविणाऱ्या थंडीत भूदल आणि हवाई दल यांनी उत्तम समन्वय राखून लष्करी कारवाई केली

India made China India realize its power at LAC, practiced at an altitude of 14 thousand feet । लडाख: भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control - LAC) चौदा हजार फुटांच्या उंचीवर युद्धाभ्यास करुन चीनला इशारा दिला आहे. हा युद्धाभ्यास सोमवार १ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आला.

युद्धाभ्यासात चौदा हजार फुटांवर भूदल आणि हवाई दल यांनी उत्तम समन्वय राखून लष्करी कारवाई केली. हवाई दलाच्या माध्यमातून विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी सैनिकांना उतरविण्यात आले. तसेच शस्त्रसाठा, वेगवान लष्करी कारवाईसाठी आवश्यक वाहने आणि तोफा 'एअरड्रॉप' करुन विशिष्ट ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. 

युद्धाभ्यास सुरू होता त्यावेळी त्या भागात उणे २० अंश से. (- 20 degree celsius) तापमान होते. रक्त गोठविणाऱ्या थंडीत भूदल आणि हवाई दल यांनी उत्तम समन्वय राखून लष्करी कारवाई केली. या युद्धाभ्यासामुळे भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा चीनला अंदाज आला. 

भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत भारताची बाजू वरचढ व्हावी आणि चीनवर दबाव टाकणे सोपे व्हावे यासाठी एक डावपेच म्हणून युद्धाभ्यास करण्यात आला. 

युद्धाभ्यासात भारताची C-130J आणि AN-32 या प्रकारातील मालवाहक विमानं सहभागी झाली. भारतीय पॅराट्रूपर्सनी मालवाहक विमानांतून पॅराशूटच्या मदतीने उड्या मारल्या. सैनिक नियोजीत ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहोचले. 

चिनी सैन्याच्या घुसखोरीला हाणून पाडण्यासाठी भारताच्या सैनिकांनी प्रतिकार केला. गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. हा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. तणाव कमी व्हावा यासाठी चर्चा सुरू आहे. पण चर्चा सुरू असताना चीनकडून भारतविरोधी वर्तन होण्याचे प्रकार वाढले आहेत. याला चोख उत्तर देण्यासाठीच भारताने चौदा हजार फुटांच्या उंचीवर युद्धाभ्यास केला. 

सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूला सैनिक आहेत. भारत आणि चीन यांचे प्रत्येकी ५० ते ६० हजार सैनिक आहेत. भारताने स्वतःच्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी सैनिकांची गस्त वाढवली आहे. भारत आत्मविश्वासाने करत असलेल्या हालचालींमुळे चीन अस्वस्थ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी