100 Cr Covid Vaccine Doses: भारताने रचला इतिहास; शंभर कोटी नागरिकांचं झालं लसीकरण, PM मोदी म्हणाले, 'आता लवकरच कोरोनाला पराभूत करू'

100 Cr Covid Vaccine Doses: देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे,

India made history 100 crore citizens were vaccinated
भारताने रचला इतिहास, शंभर कोटी नागरिकांचं झालं लसीकरण,   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा गुरुवारी 100 कोटींवर पोहोचला
  • या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, हे यश प्रत्येक नागरिकाची आहे.
  • 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता 100 कोटी लसींच्या डोसची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे. -पंतप्रधान मोदी

100 Cr Covid Vaccine Doses । नवी दिल्ली : देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. ते म्हणाले, 'मी देशातील सर्व लस उत्पादक कंपन्या, लस वाहतुकीमध्ये गुंतलेले कामगार, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी या सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो.  आज, 21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदविण्यात आला आहे. भारताने काही वेळापूर्वी शंभर कोटी डोसचा आकडा पार केला आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. भारताने अवघ्या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे.

'कोरोनाविरुद्ध एक मजबूत संरक्षणात्मक ढाल'

ते म्हणाले की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता 100 कोटी लसींच्या डोसची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे.  आपल्या एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'आपण 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा, भारतीय उद्योग आणि विज्ञानाच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी डोसचा आकडा पार केल्याबद्दल मी राष्ट्राचे अभिनंदन करतो.  हे रेकॉर्ड बनवण्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, नर्सेससह सर्व लोकांचे मी आभार मानतो.

एम्सच्या झज्जर कॅम्पसचे उद्घाटन 

यानंतर, एम्सच्या झज्जर कॅम्पसमध्ये विश्राम सदनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणाले की, इन्फोसिस फाउंडेशनने विश्राम सदनाची इमारत बांधली आहे, तर त्यासाठी जमीन आणि वीज आणि पाण्याची खर्च एम्स झज्जरने दिला आहे.

 ते म्हणाले, 'मी या सेवेसाठी एम्स व्यवस्थापन आणि सुधा मूर्ती जी यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो.' मोदी म्हणाले की, जेव्हा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णाला मोफत उपचार मिळतात, तेव्हा त्याची सेवा होत असते. या सेवेमुळेच आमच्या सरकारने कॅन्सरच्या सुमारे 400 औषधांची किंमती कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

पंतप्रधानाकडून लसीकरणातील सर्वांच्या योगदानाचं कौतुक 

पंतप्रधान म्हणाले की, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्र, खाजगी क्षेत्र, सामाजिक संस्थांनी देशाच्या आरोग्य सेवांना बळकट करण्यासाठी सतत योगदान दिले आहे. आयुष्मान भारत- पीएमजेएवाय हे देखील याचे उत्तम उदाहरण आहे. आज एम्स झज्जरमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठी सोय झाली आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये बांधलेल्या या विश्राम सदनमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चिंता कमी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी