पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान

गेल्या अनेक दिवसंपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सराकर एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे.

Imran_Khan and Narendra_Modi
Imran Khan and Narendra Modi 

थोडं पण कामाचं

  • मोदी सरकार पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत
  • भारतामधून पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याच्या तयारीत भारत
  • जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सरकारचा चांगलाच तीळपापड झाला आहे. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार संबंध तोडले, बस सेवा, रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना दिसत आहे. याच पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आता मोदी सरकार असल्याचं दिसत आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बुधवारी म्हटलं की, सिंधू पाणी करारानुसार आपल्या हिस्स्याचं पाणी रोखण्यावर प्राथमिक विचार सुरू आहे.

भारतातून सिंधू पाणी करारानुसार मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानला मिळतं. या करारानुसार अनेक नद्यांमधील पाणी पाकिस्तानला मिळत आहे. यामध्ये रावी, व्यास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे तसेच या नद्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलस्त्रोतांचाही समावेश आहे. आता आम्ही यावर चर्चा करत आहोत की कशा प्रकारे आपल्या हिस्स्याचं पाणी पाकिस्तानात जातं ते पाणी आपल्या देशातील शेतकऱ्यांना, उद्योगधंद्यांना आणि नागरिकांच्या उपयोगासाठी वळवण्यात येईल असंही गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे.

गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुढे म्हटलं की, हायड्रॉलॉजिकल आणि टेक्नोलॉजी व्यावहारिकतेवर आम्ही काम करत आहोत. मी काम तातडीने करण्याचे आदेश मी दिले आहेत जेणेकरुन आपण आपल्या योजनांवर कार्य करु शकतो. गजेंद्र सिंह शेखावत यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे ज्यावेळी भारत आणि-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान तोंडावर आपटल्याचं पहायला मिळालं. यापूर्वी मे महिन्यात नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं की, पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादाचं समर्थन आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे भारतातून पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यावर विचार सुरू आहे.

सिंधू जल करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अयूब खान यांनी १९६० मध्ये स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार, भारताचा पूर्वेकडील नद्यांच्या (रावी, व्यास, सतलज) पाण्यावर पूर्ण अधिकार आहे. तर पश्चिमेकडील नद्यांचं (सिंधू, चिनाब, झेलम) पाणी पाकिस्तानला सोडण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...